दहेगाव (गो.)चा मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:02 AM2019-02-20T00:02:26+5:302019-02-20T00:03:01+5:30

खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पाच दिवसाच्या घडामोडीवर पडदा पडला आहे.

The road to Dahegaon (Go) started | दहेगाव (गो.)चा मार्ग सुरू

दहेगाव (गो.)चा मार्ग सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देभूसंपादन विभाग सकारात्मक : बेजबाबदारांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार आणि जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या मध्यस्थीने अखेर दहेगाव (गो.) येथील रेल्वे बोगद्याला जोडणारा जुनाच रस्ता सुरू करण्यात आला आहे. लवकरच जागा संपादीत करून प्रश्न निकाली काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर पाच दिवसाच्या घडामोडीवर पडदा पडला आहे.
सेलू तालुक्यातील दहेगाव येथे रेल्वे रुळ पार करण्यासाठी असलेल्या बोगद्याला जोडणारा रस्ता शुक्ला नामक शेतकऱ्याने बंद केला होता. या रस्त्याचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत २० वर्षांपासून प्रलंबित होता. नुकताच त्याचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला. त्यामुळे गत वर्षी या रस्त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला. नागरिकांची व प्रशासनाची अडचण लक्षात घेता सदर शेतकऱ्याने रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनास एका वर्षाची मुदत दिली होती; पण प्रशासन कुंभकर्णी झोपेतच होते. शेवटी १४ फेब्रुवारीला शेतकऱ्याने जागेचा ताबा घेतल्याने रस्ताच बंद झाला होता. परिणामी, चांगलीच तारांबळ उडाली होती. शिवाय नागरिकांसाठी दळणवळणाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने काल ठिय्या देण्यात आला. त्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, रेल्वेचे विदर्भ प्रबंधक सोमेश्वरकुमार, खा. रामदास तडस, आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, तहसीलदार महेंद्र सोनोणे, बांधकाम विभागाचे अनिल तोडे यांची बैठक झाली. त्या शेतकऱ्याला जागेचा मोबदला देत रस्ता मोकळा करण्याची हमी दिली आहे. परिणामी बंद करण्यात आलेला हा मार्ग ये-जा करण्यासाठी मोकळा करून देण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मुदत मिळाल्यानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे संकेत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याकडून देण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाला अर्धविराम मिळाला असला तरी चौकशीत काय पुढे येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The road to Dahegaon (Go) started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.