शासकीय वसाहतीतील रस्त्यांची दैना

By admin | Published: May 6, 2017 12:36 AM2017-05-06T00:36:05+5:302017-05-06T00:36:05+5:30

जिल्हास्थळी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील रस्त्यांची चाळणी झाली आहे.

Road to the government colony | शासकीय वसाहतीतील रस्त्यांची दैना

शासकीय वसाहतीतील रस्त्यांची दैना

Next

डागडुजीचा विसर : रस्त्यांचे डांबरीकरणही उखडले
वर्धा : जिल्हास्थळी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील रस्त्यांची चाळणी झाली आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. आजवर या रस्त्यांची साधी डागडूजी करण्यात आली नाही. या रस्त्यावर खोल खड्डे पडले असून यावरुन वाहन घेऊन जाणे तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.
वसाहतीतील काही रस्त्यांची खड्डं्यामुळे चाळणी झाली आहे. या रस्त्यांचा वापर वसाहतीतील कर्मचाऱ्यांसह अन्य नागरिक करतात. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा विस्तार एनसीसी मैदानापासून क्रीडा संकुल ते गो.से. महाविद्यालय आणि हेड पोस्ट आॅफिसपर्यंत आहे. या वसाहतीत महसूल विभाग, न्यायालय, पंचायत समिती तसेच विविध शासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवास आहे. येथे मुलभूत सुविधांचाही अभाव असून याक्डे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

दुरुस्तीच्या प्रस्तावावर केवळ चर्चा
या वसाहतीतील रस्ते जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महत्त्वाच्या मार्गांना जोडतात. शिवाय हे रस्ते कमी अंतराचे असल्याने येथून वर्दळ सुरू असते. मात्र रस्त्यांची झालेली दैनावस्था पाहता येथून आवागमन करताना अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यावर खोल खड्डे पडले असून पावसाळ्यात तर येथे डबके तयार होते. रस्त्यावरील डांबरीकरणाचा स्तर निघाला असून मुरूम बाहेर पडला आहे. या निसरड्या रस्त्यावरुन दुचाकी वाहन घसरून अपघात झाले. काही भागातील खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. येथे रस्ता आहे काय, असा प्रश्न वाहनचालकांना पडल्याशिवाय राहत नाही. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्याचे डागडुजी करण्यावर आजवर अनेकदा चर्चा झाल्याची माहिती आहे. अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

 

Web Title: Road to the government colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.