समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील रस्त्यांवर फुलली हिरवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:11+5:30
२०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या घुमनखेडा-पारोदी, वायगाव गोंड-टेकाडी, गिरगाव पाटी-कोरा, खापरी, खुर्सापूर-गिरड मार्गावर कडूनिंब, पेल्टाफार्म, निंब, जांभूळ, आवळा, पिंपळ, शिरस, गुलमोहर आदी विविध जातींची वृक्ष लावण्यात आली. व्यवस्थित संगोपणामुळे सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाडे जीवंत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समुद्रपूर वनपरिक्षेत्रांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा केलेली वृक्षलागवड आणि त्याचे संगोपण यामुळे हिरवळ फुलली असून हे रोपवन ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्यात आले आहे.
२०१८-१९ च्या पावसाळ्यात २४ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. सध्या वनपरिक्षेत्रातील वृक्षांची उंची आठ ते १० फूट आहे. सुमारे ९० टक्के झाडं जिवंत आहेत. २०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या घुमनखेडा-पारोदी, वायगाव गोंड-टेकाडी, गिरगाव पाटी-कोरा, खापरी, खुर्सापूर-गिरड मार्गावर कडूनिंब, पेल्टाफार्म, निंब, जांभूळ, आवळा, पिंपळ, शिरस, गुलमोहर आदी विविध जातींची वृक्ष लावण्यात आली. व्यवस्थित संगोपणामुळे सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक झाडे जीवंत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लोकसहभागातून लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन ग्रामपंचायत कर्मचारी, मजूर, हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले जात आहे. त्यामुळेच हे यश मिळाल्याने ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला असून रस्त्याच्या सौंदर्यीकरणातही भर पडली आहे.