बुरखा परिधान करून चोऱ्या करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 10:40 PM2019-01-04T22:40:22+5:302019-01-04T22:40:46+5:30
येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस
ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे साहित्य जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शर्मा यांच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात बुरखा परिधान करून आलेल्या पाच जणांनी दुकानातून २४ इंच एल.ए.डी. टि.व्ही. पळविला होता. त्याबाबतची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी अकोला येथून रेहाना बि.सैय्यद कदीर (४५), रशिदा बि. शेख दिवान (४५), कुंदा गजानन येन्नेवार (६५), मोहम्मद अकील उर्फ राहुल मोहम्मद अकील (३८), फातेमा बी. सैय्यद नजीर (४७) यांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ हजार रुपये किंमतीचा चोरीची एलईडी टीव्ही. जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, ठाणेदार चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड व पोशी शिल्पा पिल्लेवार यांनी केली.