अठरा एकर उभ्या कपाशी पिकावर फिरविला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:10+5:30

सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. 

Rotavator rotated on eighteen acres of vertical cotton crop | अठरा एकर उभ्या कपाशी पिकावर फिरविला रोटावेटर

अठरा एकर उभ्या कपाशी पिकावर फिरविला रोटावेटर

googlenewsNext
ठळक मुद्देचार शेतकऱ्यांनी कपाशी मोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
आगरगाव : परतीच्या पावसाने पिकांची नासाडी केली. शेतात पिकापेक्षा गवत वाढले. पाने व फुले गळतीने कपाशीच्या शेतात केवळ झाडेच उभी होती. लावलेला खर्चही वसूल होत नसल्याची शक्यता वाढल्याने मुरदगाव (बेलसरे) येथील युवा शेतकरी चेतन येंडे यांनी पाच एकर शेतातील कपाशी पिकावर रोटावेटर फिरविला. देवळी तालुक्यातील शेतशिवारात कपाशीचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे हाती देईल, अशा उत्तम स्थितीत असताना परतीच्या पावसाने पिकांची स्थिती विदारक झाली. शेतकरी चेतन येंडे यांची मुरदगाव (बेलसरे) येथे पाच एकर शेती आहे. संपूर्ण शेतीसाठी २० हजार रुपयांचे बियाणे घेतले. पेरणीचा खर्च १० हजार रुपये झाला. मशागतीसाठी शेतीला १० हजार लागले. निंदण मजुरी ३० हजार असा एकूण ७० हजार रुपये खर्च लागला. सततच्या पावसाने शेतात पिकापेक्षा गवत वाढले. शेतात जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर चिखल असल्याने शेतीची मशागत करता आली नाही. हिरवे स्वप्न साकार होईल, असे वाटत असताना दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कहर केला. त्यामुळे कपाशीच्या पाने व फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. बोंडातून बाहेर आलेला कापूस वेचणी न झाल्याने भिजला असून, कापसाचा सडा शेतशिवारात पडला आहे. कपाशीची बोंडे सडली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. 
पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होणार नसल्याने निराश होऊन संपूर्ण पाच एकरातील कपाशी पिकावर रोटावेटर फिरवला आहे. दिवाळी सणाला दिवा लावण्यासाठी व पूजेसाठी नवा कापूस घरी नव्हता, अशी भीषण ओल्या दुष्काळाची परिस्थिती ग्रामीण भागात आहे. पिकावर रोटावेटर फिरविल्याने रब्बी हंगामासाठी पैसा नाही. वर्षभर घरखर्च कसा चालवायचा, असा प्रश्न आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शासन आदेशानंतरही नुकसानीचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. 
चार शेतकऱ्यांनी कपाशी मोडली
यावर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस सुरू राहिल्याने मशागतीची कामे करता आली नाही. कपाशी पीक सततच्या पावसामुळे पिवळे पडले असून, फुले आणि पात्या गळतीमुळे पिकाची स्थिती चिंताजनक झाली. पेरणीपासून कपाशी पिकावर झालेला खर्चही वसूल होणार नव्हता. त्यामुळे १८ एकर कपाशी पिकावर रोटावेटर फिरवला असल्याची माहिती  मुरदगाव (बेलसरे) येथील शेतकरी सुभाष  येंडे, प्रताप  भलावी, संगीता येंडे, व चेतन येंडे यांनी दिली.

कापसाची शेती यावर्षी तोट्याची ठरली. लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने पाच एकर शेतातील कपाशीवर रोटावेटर फिरवला. कर्जाचा डोंगर कायम असून, सरकारी मदत पदरात कधी पडेल, याकडे लक्ष लागले आहे.
- चेतन येंडे, 
युवा शेतकरी,                    मुरदगाव (बेलसरे)
 

Web Title: Rotavator rotated on eighteen acres of vertical cotton crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.