भिडीत सरपंच निवडणूक प्रक्रिया वादाच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 09:09 PM2019-05-15T21:09:29+5:302019-05-15T21:09:58+5:30
अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचीन बीरे व व सेना कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना साकडे घातले. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी भिडी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक आयोजीत करण्यात आली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी १२ वाजेपर्यंत होती. काँग्रेसचे उमेदवार अतुल खत्री यांनी नामांकन दाखल केल्यानंतर शिवसेनेचे मनोज बोबडे यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पं.स.चे विस्तार अधिकारी प्रमोद लाकडे यांचे स्वाधीन केला. यावेळेस ग्रा.पं.कार्यालयाच्या घड्याळीत ११ वाजून ५५ मिनीटाची वेळ झाली होती. परंतू माझ्या मनगटाचे घड्याळीत १२ वाजून ५ मिनीटाची वेळ झाली असल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगुन माझे नामांकन रद्द केले. असा आरोप उमेदवार बोबडे व शिवसेना पदाधिकाºयांनी केला. अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ८, भाजपा २ व काँग्रेस १ असे संख्याबळ असून सरपंच पद शिवसेनेकडे आहे. या ग्रा.पं.मध्ये सेना - भाजपाकडे स्पष्ट बहुमत असतांना उपसरपंच पदासाठी काँग्रेस उमेदवाराची झालेली निवड सेना पदाधिकाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. नामांकन दाखल करण्याच्या वेळेपर्यत या पदाच्या उमेदवाराबाबत घोळ असल्याने सेनेचा नामाकंन अर्ज अगदी वेळेवर पोहचला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, देवळीचे तहसीलदार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे राहणार आहे.
सेनेचे उपसरपंच पदाचे उमेदवार मनोज बोबडे यांचे नामाकंन १२ वाजून ५ मिनिटांनी आले. तशा प्रकारची वेळ टाकून त्यांना पावती देण्यात आली. यामध्ये कोणताही पक्षपात करण्यात आला नाही. या निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
- प्रमोद लाकडे,
निवडणूक निर्णय अधिकारी,
भिडी.