जामठ्यातील रुख्माई स्टोन क्रशर सील; 11 लाख 50 हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 10:29 PM2022-11-18T22:29:11+5:302022-11-18T22:30:19+5:30

जिल्हाधिकारी यांच्या आकस्मिक तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह तलाठी व कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जामठा शिवारातील पूजा चंद्रकांत दौड यांच्या नावे असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला भेट दिली. यावेळी विनापरवानगी दगडगोट्यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

Rukhmai Stone Crusher Seal in Jamtha; 11 lakh 50 thousand fine | जामठ्यातील रुख्माई स्टोन क्रशर सील; 11 लाख 50 हजारांचा दंड

जामठ्यातील रुख्माई स्टोन क्रशर सील; 11 लाख 50 हजारांचा दंड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यामध्ये अवैधरीत्या होत असलेल्या गौणखनिज उत्खननाला आळा घालण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी पथकाची निर्मिती केली आहे. या पथकाने पहिल्याच तपासणीत जामठा शिवारातील अवैधरीत्या सुरू असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला दणका दिला. हे स्टोन क्रशर सील केले असून, ११ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच ईटीएसव्दारे मोजमाप करून आणखी दंडात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आकस्मिक तपासणी पथकातील जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळूताई भागवत यांच्यासह तलाठी व कोतवाल यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी जामठा शिवारातील पूजा चंद्रकांत दौड यांच्या नावे असलेल्या रुख्माई स्टोन क्रशरला भेट दिली. यावेळी विनापरवानगी दगडगोट्यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या ठिकाणाहून दोन ट्रक व एक पोकलेन जप्त करण्यात आला. त्यानंतर आज शुक्रवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वत: या घटनास्थळी पाहणी केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच ईटीएस मोजमाप करून अवैध उत्खननाचे परिणाम निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे दोन ट्रककरिता चार लाख आणि एका पोकलेनकरिता सात लाख ५० हजार असा ११ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैधरीत्या सुरू असलेले स्टोन क्रशरही सील करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड, तहसीलदार रमेश कोळपे, तलाठी देवेंद्र राऊत आदींची उपस्थिती होती. या कारवाईमुळे गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

खदानींना तारेचे कुंपण अत्यावश्यक
-    खदानमालकांनी अवैधरीत्या खोदकाम करून गौणखनिजांचे उत्खनन केले आहे. त्यामुळे खदान परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले आहे. या खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी अपघातही झाले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी  खदानीच्या तारेचे कुंपण करून घेण्याचे निर्देश आहे. परंतु जिल्ह्यात याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पुन्हा सर्व खदान मालकांनी तारेचे कुंपण करणे अत्यावश्यक असल्याचे निर्देश दिले आहे.

याही परिसरात तपासणी करण्याची गरज
-    जिल्ह्यामध्ये गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याचे दिसून येत आहे. वर्ध्यालगतच्या पिंपरी (मेघे), सिंदी (मेघे) व उमरी (मेघे) परिसरातील टेकड्यांवर उत्खनन केले जात आहे. शिवाय सेलू तालुक्यातील येळाकेळी व खेरडा परिसरातही मोठ्या प्रमाणात खदानी असून, येथेही अवैधरीत्या खोदकाम करून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे रस्त्यालगत असून, जीवघेणे ठरणारे आहे. तसेच देवळी तालुक्यातील देवळी, पुलगाव, गुंजखेडा, आगरगाव यासह सेलू, हिंगणघाट, आर्वी व आष्टी तालुक्यातील खदानींवरही अशीच परिस्थिती असल्याने या सर्व खदानीवर लक्ष केंद्रित करून धडक कारवाईच्या माेहिमेला आखणी गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Web Title: Rukhmai Stone Crusher Seal in Jamtha; 11 lakh 50 thousand fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.