इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:13 PM2018-05-30T23:13:34+5:302018-05-30T23:13:52+5:30

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Rukukha roadaroko against fuel price hike | इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

googlenewsNext
ठळक मुद्देसमीर देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे; पण सरकार यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासन सामान्यांना दिलासा मिळेल, असे पाऊल उचलताना दिसत नाही, असे समीर देशमुख यांनी सांगितले. वर्धा, सेलू, आर्वी, देवळी येथे याच मुद्यावर रायुकाँने आंदोलन केले. यात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे जनतेचे सरकार, असे मोदी सरकार म्हणते तर जनता बेहाल का, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देवळी-पुलगाव क्षेत्रातील शेतकरी समस्यांवर देवळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कपाशीवर आलेली बोंडअळी व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले. याची शासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्याने शेतकºयांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुलगाव पोलिसांनी समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, श्यामसुंदर देशमुख, अजित ठाकरे, राहुल घोडे, अजित ठाकरे, संजय बोबडे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रकाश काकडे, किशोर डांगे, सुभाष ढोले, महादेव भोयर, विजय भटकर, किरण टाके, प्रवीण ढांगे, गजानन भानखेडे, दत्तात्रय धांडे, विजय धोपटे, भालचंद्र पेटकर, संजय चौधरी, संजय सारासर यासह रायुकाँ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनीही सहभाग घेतला होता.

Web Title: Rukukha roadaroko against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.