स्त्री अत्याचाराबाबत सत्तारूढ़ राज्यकर्ते असंवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 06:21 PM2021-02-10T18:21:05+5:302021-02-10T18:21:20+5:30
भाजपा महाराष्ट उपाध्यक्ष चित्र वाघ यांचा आरोप।
हिंगणघाट ( वर्धा ) - महाराष्ट्रातील सत्तारूढ राज्यकर्ते स्त्री अत्याचाराबाबत असंवेदनशील असल्याने स्त्रियां वरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असा आरोप भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आमदार समिर कुणावार यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
प्राध्यापिका जळीत कांडाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य हिंगणघाट येथे आयोजित श्रद्धाजंलि कार्यक्रमाकरिता त्या उपस्तित होत्या.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की हिंगणघाट येथील जळीतकांडा नंतर महाराष्ट्रात स्त्री अत्याचाराच्या सात गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या तरीही राज्यकर्ते निद्रावस्थेत आहे. महाराष्ट्रात दिशा कायदा करण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु त्यालाही खुप विलंब होत आहे. स्त्री अत्याचाराबाबत पोलीस प्रशासन सुद्धा गंभीर नाही असे अनेक प्रकरणातून दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवशाही आहे की मोगलाई हा प्रश्न उपस्तित होत आहे. मुख्यमंत्रानी शिवशाही राज्य प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवावे. असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. पिडितेच्या कुटुबियाना शासनाने आर्थिक मदत व कुटुबातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आस्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता आज पावेतो केलेली नाही. त्यांनी दिलेल्या लेखी आस्वासनाचा सुद्धा विसर पडला आहे. ही पालकमंत्राची जबाबदारी आहे परंतु ते आपली जबाबदारी विसरले आहे. असाही आरोप त्यांनी केला. आ समिर कुणावार यांनी पिडीतेला न्याय मिळण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला असेही त्या म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेत् नगराध्यक्ष प्रेम बसंतानी , भाजपा महामंत्री किशोर दिघे , आकाश पोहाने, संजय डेहने, मनीष देवढे उपस्थित होते.