धावत्या एसटी बसचे ब्रेक झाले फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:07+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यालगत बराच काळ बसावे लागले. दरम्यान मोशी-हिंगणघाट ही बस मार्गावरून जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक जुन्या बसगाड्या जिल्ह्यातील विविध आगारात धावत आहे. या बसची वेळीच दुरूस्ती होत नसल्याने प्रवाशांच्या जीवानिशी खेळ सध्या परिवहन मंडळाने सुरू केला आहे. तळेगाव आगाराची मोर्शी-वर्धा ही बस गुरूवारी आर्वी जवळच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे बंद पडली. या बसमधील प्रवाशांना दीड ते दोन तास जंगलात थांबून राहावे लागले.
राज्य परिवहन महामंडळाच्या तळेगाव, आर्वी आगारात बस रस्त्यातच नादुरूस्त होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गुरूवारी मोर्शी-वर्धा ही तळेगाव आगाराची बस क्रमांक एमएच ४० एन ८२१२ ही आर्वीच्या जंगलात ब्रेक फेल झाल्यामुळे नादुरूस्त होऊन पडली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यालगत बराच काळ बसावे लागले. दरम्यान मोशी-हिंगणघाट ही बस मार्गावरून जात होती. बंद पडलेल्या बसच्या वाहकांनी या बसला प्रवासी घेण्यासाठी थांबण्याचा इशारा केला मात्र या बसच्या चालकांनी बस तेथे थांबविली नाही. अशी माहिती या बसमधून प्रवास करणाऱ्या दीपक कदम यांनी लोकमतशी बोलतांना दिली. या मार्गावर सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे बसगाड्यांचे बेहाल झाले आहेत. बसगाड्या बंद पडणे ही नित्यांचीच बाब झाली असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.