वैद्यकीय अधिकाऱ्याविना ग्रामीण रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:22 AM2018-08-25T00:22:03+5:302018-08-25T00:23:50+5:30
सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे. येथे रुग्णांना रांगेत तास न तास उभे राहण्याची वेळ आली.
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाºयांचे पदे आहेत. तीनही जागा रिक्त आहे. गत पंधरा दिवसाअगोदर डॉ. शकिल यांची तक्रारीवरून बदली करण्यात आली. पण बदली अधिकारी देण्यात आला नाही. ज्या रुग्णालयात दररोज विविध आजाराचे ३०० ते ४०० रुग्ण तपासणीकरिता येतात. त्या रुग्णांची तपासणी करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता रुग्णांना रांगेत उभे राहून आपला नंबर लागण्याची प्रतिक्षा करावी लागते.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर वरिष्ठांचे दुर्लक्ष कसे असा प्रश्न निर्माण होत आहे तरी येथील रिक्त वैद्यकीय अधिकाºयांची पदे त्वरीत भरून रूग्णालयात येणाºया रूग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी अलिकडेच तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.
वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्तच
सेलू येथील ग्रामीण रूग्णालय हे जिल्ह्यातील जुने रूग्णालय आहे. पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. त्याचे रूपांतर ग्रामीण रूग्णालयात झाले. तत्कालीन आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते या रूग्णालय वास्तुचे उद्घाटन झाले. येथे नेहमीच वैद्यकीय अधिकाºयांची पदे पूर्णपणे भरली जात होती. परंतु अलिकडे नेहमीच पद रिक्त राहत आहेत. शासनाचे व लोकप्रतिनिधीचे याकडे दुर्लक्ष आहे. या रूग्णालयात गरमसूर पासून रूग्ण येतात. परंतु वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने अनेक रूग्णांना सेवाग्राम किंवा सांवंगी पाठवावे लागते. त्यामुळे सरकारी रूग्णालयाच्या सेवेचा लाभ नागरिकांना मिळत नाही.
रुग्णालयात दररोज ३५० ते ४०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात तपासणी करीता येत आहे. रिक्त असलेल्या पदावर वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्याबाबतचे पत्र वरिष्ठांना पाठविले आहे.
- कीर्ती पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, सेलू.