सुरक्षित मातृत्व ही समाजाची जबाबदारी
By admin | Published: July 18, 2015 01:57 AM2015-07-18T01:57:02+5:302015-07-18T01:57:02+5:30
आज गर्भवती मातांची काळजी घेणाऱ्या अद्यावत चाचण्या, पूर्वतपासण्या आणि सहजपणे होईल अशी वेदनारहित प्रसूतीची साधने उपलब्ध आहेत.
सिंधू भुते : आशा सेविका मेळाव्याला मार्गदर्शन
वर्धा : आज गर्भवती मातांची काळजी घेणाऱ्या अद्यावत चाचण्या, पूर्वतपासण्या आणि सहजपणे होईल अशी वेदनारहित प्रसूतीची साधने उपलब्ध आहेत. याला मानवी सहकार्याची जोड देण्याची नितांत गरज आहे. सुरक्षित मातृत्वाची जबाबदारी ही केवळ त्या स्त्रीची, तिच्या नवऱ्याची किंवा कुटुंबाची नसून संपूर्ण समाजाची आहे. याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सिंधू भुते यांनी केले.
सावंगी (मेघे) येथे आशा वकर्स मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात गर्भवती माता तसेच आशा स्वयंसेविकांकरिता मार्गदर्शनपर मेळावा पार पडला.
या कार्यक्रमाला नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. दीप्ती श्रीवास्तव, शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी येवला-पाटे, बालरोग तज्ज्ञ डॉ. पुरंदरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सी. हरिहरण, डॉ. सौनेत्रा इनामदार, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, परिचारिका विद्यालयाच्या प्राचार्य बेबी गोयल, प्रशासकीय अधिकारी शर्मिला परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. इनामदार यांनी गर्भवती व बाळंत मातेची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ. येवला यांनी स्त्रियांना होणारे कर्करोग, मॅमोग्राफी आणि पॅपस्मीअर तपासणी यावर प्रात्यक्षिकातून आशा सेविकांना माहिती दिली. डॉ. मोनिका पोचमपल्लीवार यांनी वेदनारहित प्रसूती याबाबत आशांना पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनीही आशा सेविकांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाचे संचालन नंदा गाडगे यांनी केले तर आभार विनया भरणे यांनी मानले. मेळाव्याला एन.पी. शिंगणे, अजय ठाकरे, सुलोचना मोहोड, छाया धोंगडे, छाया बोबडे, इंदू आलवटकर, दीपमाला मेंढे, शालिनी मून, हेमंत पुंडकर यासह आदींनी सहकार्य केले. यावेळी आशा सेविका तसेच परिचारिका उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)