गावगाड्याचा लोकवाहिनीतून सुरक्षित प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:27+5:30
सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गावगाड्याशी संपर्क साधून अर्थव्यवस्थेला चालना देणाºया लोकवाहिनीचे चाके गेल्या पाच महिन्यानंतर रुळावर यायला सुरुवात झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बसप्रवासाला विना ई-पास परिवानगी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून लालपरी जिल्ह्याबाहेर जाऊन प्रवाशांना सेवा देण्यासोबतच झालेल्या नुकसानीलाही भरुन काढण्यासाठी आटापीटा करीत आहे. पण, मर्यादीत प्रवाशी संख्येच्या बेड्या असल्याने ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या २० ते २५ बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २२ प्रवाशांनाच विनापास प्रवास करण्याची मुभा असल्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, काटोल, मोर्शी, उमरेड, वरुड, राळेगाव आदी ठिकाणी बसप्रवास सुरु आहे. सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्यानुसार बसस्थानकावर बसचे निर्जतुकीकरण करणे, प्रवाशांची नोंद घेणे, बसस्थानकाची स्वच्छता करणे, हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या जो की नाही, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ च्या स्थानिक प्रतिनिधींनी थेट वर्धा, पुलगाव, हिंगणघाट व आर्वीचे बसस्थानक गाठले. तेव्हा काही ठिकाणी या सुविधांचा अभाव दिसून आला तर काही ठिकाणी सर्व सुविधा असूनही प्रवाशांकडून त्याचा उपयोग घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे.
वर्धा स्वच्छता आहे पण,
वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी इतर जिल्ह्यातून येणाºया बसेसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथून लगतच्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, उमरखेड, राळेगाव, वरुड, मोर्शी, राजूरा या ठिकाणी जाणाºया बसेसचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही संख्या मोठी असते. पण, शासनाने ठरवून दिल्यानुसार बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आणि बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसचे निर्जतुकीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था दिसली नाही.
निर्जंतुकीकरणाचा पत्ता नाही
तसेच बसस्थानकावर हात धुण्यासाठी कुठेही हॅण्डवॉश, सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र, बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची वाहकांकडून नोंद घेतली जात होेती. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना सोशल डिस्टंन्स ठेऊन बसविले जात होते. यावेळी नागपूरातून आलेल्या एका बसचालकाला विचारले असता नागपूरमध्ये बस सॅनिटाईझ झाली पण, वर्ध्यात तशी सुविधा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धा आगारानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.