संत केजाजी महाराज दिंडीचा आळंदीत तपपूर्ती सोहळा, सोहळ्याची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 10:48 PM2017-11-07T22:48:12+5:302017-11-07T22:49:07+5:30
वर्धा : विदर्भाची प्रतिपंढरी असलेल्या तीर्थक्षेत्रातील संत केजाजी महाराज यांच्या नावाने आषाढी एकादशीला आळंदी ते पंढरपूर जाणा-या पायदळ दिंडीचा तपपूर्ती सोहळा आळंदीत होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
वर्धा : विदर्भाची प्रतिपंढरी असलेल्या तीर्थक्षेत्रातील संत केजाजी महाराज यांच्या नावाने आषाढी एकादशीला आळंदी ते पंढरपूर जाणा-या पायदळ दिंडीचा तपपूर्ती सोहळा आळंदीत होणार असून याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत केजाजी महाराज यांचे नावाने गत १२ वर्षांअगोदर नरेश पाटील यांनी घोराडवरूण आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीला सुरूवात केली. ही दिंडी घोराडवरून आळंदीपर्यंत वाहनाने प्रवास करून आळंदीवरून निघणा-या सोहळ्यात सामील राहुत असूत. या दिंडीला १२ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून नरेश महाराज यांनी आळंदीत तपपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे.
आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळाही याच कालावधीमध्ये असल्याने वर्र्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक आपली हजेरी लावणार आहे. या सात दिवसात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होणार असून या कथेचे प्रवक्ता नरेश महाराज असणार आहेत. तर संत केजाजी महाराजांचे वंशज विठ्ठल महाराज भांदककर, रवींद्र विलायतकर, वसंत विरूळकर, संतोष ठाकरे, प्रमोद ठाकरे, निवृत्ती महाराज, दत्ता पवार, मुरेकर महाराज, कृष्णा घोडके या संत मंडळींच्या किर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
य दिंडीचे विणेकरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बबनराव माहुरे महाराज आहे. या सोहळ्यात सातही दिवस सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. हा सोहळा आळंदी येथे देवू रोडवरील वसंत पार्क येथे. साजरा होणार असून आळंदीत संत केजाजी नामाचा जयघोष या निमित्ताने होणार असून या सोहळ्याच्या जय्यत तयारीला भक्तगण लागले आहे.
नुकताच नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात नरेश महाराज आळंदीकर यांनी संत केजाजी महाराज यांचे नावाने सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. कुंभमेळ्यात केजाजी नामाचा दुमदुमलेला जयघोष आता आळंदीतही या निमित्ताने दुमदुमणार आहे.