कारखान्यातील कॅन्टीनच्या अल्पोपहारात आढळली पाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:37 PM2018-06-15T23:37:17+5:302018-06-15T23:37:17+5:30

जामणी येथील मानस शुगर अ‍ॅण्ड पावर कारखान्याच्या कॅन्टींनमध्ये अल्पोपहारात मृत पाल आढळली. या घटनेमुळे कामगारांत खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

Sail found in canteen of a canteen in the factory | कारखान्यातील कॅन्टीनच्या अल्पोपहारात आढळली पाल

कारखान्यातील कॅन्टीनच्या अल्पोपहारात आढळली पाल

Next
ठळक मुद्देकंत्राट रद्द करणार : कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जामणी येथील मानस शुगर अ‍ॅण्ड पावर कारखान्याच्या कॅन्टींनमध्ये अल्पोपहारात मृत पाल आढळली. या घटनेमुळे कामगारांत खळबळ उडाली होती. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या या कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
नेहमीप्रमाणे क्षणभर विश्रांती घेत भुकेने व्याकुळ अल्पोपहारासाठी सदर कॅन्टीनमध्ये आला होता. त्याने हॉटेल व्यावसायिकास शेवचिवडा मागितला. सदर कामगाराला कागदात शेवचिवडा देण्यात आला. ती कागदी पुडी उघडली असता चिवड्यामध्ये मृत पाल असल्याचे दिसून आले. यामुळे कामगारांसह हॉटेल व्यावसायिकाची चांगलीच तारांबळ उडाली होती. विविध खाद्यपदार्थ व्यवस्थित व योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे; पण येथील कॅन्टीनमध्ये नेहमीच खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवले जात असल्याने हा प्रकार घडला असावा, असा आरोप तेथील कामगारांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री करणाºया सदर कॅन्टीन व्यावसायिकावर कार्यवाही करावी, अशी मागणी काही कामगारांनी केली. या प्रकरणात कारखाना व्यवस्थापन काय निर्णय घेते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

कॅन्टीनचे कंत्राट दिलेल्या व्यावसायिकाने दर्जेदार खाद्यपदार्थ कामगारांना देणे क्रमप्राप्त आहे. शेवचिवड्यात मृत पाल आढळल्याची माहिती कामगारांनी दिली. चौकशी करून दोषींवर कार्यवाही केली जाईल. वेळप्रसंगी कॅन्टीनचा करारही रद्द करू.
- जयंत ढगे, महाव्यवस्थापक़
 

Web Title: Sail found in canteen of a canteen in the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.