सेलूचा आॅटोचालक सतीश खरा स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:14 AM2017-10-28T01:14:42+5:302017-10-28T01:14:56+5:30

समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे.

Sailu Autor Satish Khara Cleaner | सेलूचा आॅटोचालक सतीश खरा स्वच्छतादूत

सेलूचा आॅटोचालक सतीश खरा स्वच्छतादूत

Next
ठळक मुद्देगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा : स्वत:च करतो शौचालयाची स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराला आपल्या कृतीत उतरवून स्वकृतीतून नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत आहे. नगरपंचायतीने वडगाव मार्गावर नालीवर उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या टाकीत लोकवर्गणीतून घेतलेल्या पाईपने पाणी भरणे व स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्याचे काम तो निस्वार्थपणे करतो. या अवलियाचे नाव सतीश बबनराव तडस असे आहे.
सतीश व्यवसायाने आॅटोचालक आहे. दिवसभराच्या कष्टातून वाचलेल्या पैशावर तो कुटुंबाचा गाढा हाकतो. वडगाव मार्गावर बसस्थानकाच्या मागे नालीवर महिला व पुरूषांच्या सोयीसाठी नगरपंचायतीने स्वच्छतागृह सुरू केले. प्रचंड गर्दीमुळे स्वच्छतागृह घाण झाले. नाकाला सहन होणार नाही इतकी दुर्गंधी सुटली. आॅटो घेवून जाताना हे चित्र सतीशच्या नजरेत पडले. त्याच्या हृदयात संतमहात्म्याच्या निस्सीम समाजसेवेच्या व स्वच्छतेचा असलेला विचार अलगदपणे कृतीत उतरला. त्याने त्याच क्षणी निश्चिय करून त्याच्या डोक्यातील कल्पना मित्र गणेश खोडके यांना सांगितली. गणेश यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी करून त्याला टाकीत पाणी भरण्यासाठी रबरी पाईप घेवून दिला. त्या दिवसापासून सतीश नियमित स्वच्छतागृहाची साफसफाई करतो व टाकीत पाणी भरतो.
आपल्या कृतीतून गाडगेबाबांच्या व तुकडोजी महाराजांच्या समाज कार्याला जिवंत ठेवण्याचे काम करणारा २८ वर्षीय सतीश सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. खोट्या प्रसिद्धीच्या नादात लागणाºया ढोंगी समाजसेवकांनी सतीशचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ही घाण नियमित साफ करणाºया सतीशला कधी या कामाची किळस वाटली नाही. थोर संत महात्म्यांच्या कार्याचे अनुकरण आपण करतो आहे याचा आनंदच मला दिवसभर आॅटो चालविण्याची उर्जा देते, असे भोळे उत्तर तो देतो. सतीशला कधी या कामाचा मोठेपणा वाटला नाही. प्रसिद्धीची तर त्याला गरजच नाही. सहज रस्त्याने जाताना त्याचे हे काम बघून सर्व थक्क होतात. त्याचे खरे कार्य पाहून समाजसेवेचे ढोंग करून समाजात खोटी प्रतिष्ठा निर्माण करणाºयांचे बुरखे आपोआप गळून पडतात.

Web Title: Sailu Autor Satish Khara Cleaner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.