दोन कोटींतून साकारणार सखी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:48 PM2018-03-29T23:48:31+5:302018-03-29T23:48:31+5:30

आपण तयार केलेल्या उत्पादनाला जोपर्यंत बाजारपेठ उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनस्तरावर प्रयत्न होत आहे.

Sakhi Center will come out of the two crores | दोन कोटींतून साकारणार सखी सेंटर

दोन कोटींतून साकारणार सखी सेंटर

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा

ऑनलाईन लोकमत
देवळी : आपण तयार केलेल्या उत्पादनाला जोपर्यंत बाजारपेठ उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. युवक, युवती व महिलांनी यासाठी कसोटी पणाला लावून अधिकाधिक स्वयंरोजगार उभा करावा, असे विचार खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले. येत्या एक महिन्याच्या कालावधीत देवळीत दोन कोटींच्या खर्चातून सखी सेंटर विकसित करून महिलांच्या सक्षमीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची हमी त्यांनी दिली.
जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने आयोजित महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, जि.प. शिक्षण सभापती जयश्री गफाट, पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर व गटनेता शोभा तडस यांची उपस्थिती होती.
खा. तडस यांनी पुढे बोलताना म्हणाले, देशाची महिला सक्षम होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व विकसीत केले जात आहे. चीनच्या तुलनेत आपल्या देशाची बाजारपेठ उभी राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न होत आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील देवळी व वर्धा येथे १२०० घरांची उभारणी होत आहे. या सर्व योजना कार्यान्वित होत असताना जि.प. व न.प.च्यावतीने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
उद्घाटक म्हणून बोलताना जि.प. सभापती भिसे यांनी महिलांच्या शैक्षणिक बाबींवर भर दिला. घरातील एक शिक्षित महिला संपूर्ण कुटुंबासाठी मार्गदर्शन ठरत असल्याने मुलींच्या शिक्षणाला व्यापक स्थान देणे गरजेचे आहे. रोजच्या आर्थिक नियोजनासोबतच स्वयंरोजगाराच्या संधीमुळे महिलांचे सक्षमीकरण शक्य आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जि.प. शिक्षण सभापती गफाट, पं.स. सभापती भुजाडे, उपसभापती गव्हाळकर, हभप दिगांबर गाडगे महाराज व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भाषणे झाली.
ग्रामीण विकास यंत्रणेचे समन्वयक देवकुमार कांबळे व इतरांनी शासनाच्या अनेक योजनांची माहिती देऊन महिलांच्या सामाजिक उत्थानासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी तालुक्यातील महिला बचत गटाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तूच्या स्टॉलचे उद्घाटन अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक पं.स. बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री साळवे यांनी केले. संचालन पल्लवी तिवरे व डफरे यांनी केले. कार्यक्रमाला जि.प. सदस्य सुनिता राऊत व मयुरी मसराम, हिंगणघाट पं.स. सभापती कोल्हे, पं.स.गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, भाजपाचे अशोक कलोडे, दशरथ भुजाडे, पं.स. सदस्य स्वप्नील खडसे, युवराज खडतकर, दुर्गा मडावी, आरती इंगोले तसेच न.प. सदस्य सारीका लाकडे व तालुक्यातील महिलांची होती.

Web Title: Sakhi Center will come out of the two crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.