शेतकऱ्याच्या भूसंपादित जमिनींचा विक्री व्यवहार रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:21 PM2019-05-29T22:21:51+5:302019-05-29T22:22:15+5:30
शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या भूसंपादीत जमिनींचा विक्री व्यवहार रखडला असून ही समस्या तातडीने निकाली काढावी, अशी मागणी जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पात शेतकºयांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत वायगाव (नि.) येथील शेतकरी लघुकालवा ६, ८ साठी शासनाने जमिनीचे अधिग्रहण केले आहे. परंतु, गेल्या ६ महिन्यांपासून सदर शेतकºयाच्या जमिनीची विक्री प्रलंबीत आहे. येत्या ५ जूनपर्यंत या भूसंपादीत जमिनीच्या विक्री न केल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा जि.प.चे माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी दिला आहे. या प्रश्नासंदर्भात बुधवारी भेंडे यांच्या नेतृत्वात शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. कोरडवाहू शेती नसतानाही चुकीचे मुल्यांकन केले गेले. ते दुरुस्त करून शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सदर जमिनीच्या विक्री कराव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या शिष्टमंडळात ग्रा.पं. सदस्य प्रफुल्ल मोते, विजय वाटमोडे, मधु तलमले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकºयांचा समावेश होता.