समुद्रपूर पोलीस ठाण्याला मिळाले आयएसओ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:22 AM2018-12-22T00:22:23+5:302018-12-22T00:22:54+5:30
स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत टेक्नो आर्ट सर्व्हिसेस संस्थेने आय.एस.ओ. मानांकन जाहीर केले. विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून या ठाण्याने बहुमान प्राप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत टेक्नो आर्ट सर्व्हिसेस संस्थेने आय.एस.ओ. मानांकन जाहीर केले. विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून या ठाण्याने बहुमान प्राप्त केला आहे.
पोलिस ठाण्याच्या प्रांगणात प्रमाणप्रत्र हस्तांतरण समारोहाचे आयोजन गुरुवारी, २० डिसेबंरला करण्यात आले होते. यावेळी टेक्नो आर्ट सर्व्हिसेस दिल्लीचे संचालक दत्ता चक्रवर्ती यांनी ठाणेदार प्रवीण मुंडे यांना आयएसओ प्रमाणप्रत्र प्रदान केले. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ बसराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, हिंगणघाटचे ठाणेदार बंडीवार, नगरपंचायत अध्यक्ष गजानन राऊत, गिरडचे ठाणेदार महेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, या पोलिस ठाण्याने विदर्भात पहिले स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून ओळख निर्माण करीत आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. यामुळे येथील कर्मचाºयांचे काम संपले असे नाही, तर त्यांचे खरे काम आता सुरू झाले. ज्याप्रमाणे येथील इमारत व परिसर सुंदर आहे, त्याचप्रमाणे येथे येणाºया पीडित तक्रारकत्यार्ला सन्मानाची वागणूक देऊन त्यांचा पाहुण्याप्रमाणे मान करुन तक्रारीचे निवारण कसे केले जाईल, याची कर्मचाºयांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे मत मांडले. २ वर्षांपूर्वी समुद्रप्पूर पोलिस ठाण्याच्या इमारतीची व परीसराची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात चांगली नव्हती. ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी सप्टेबर २०१६ ला या पोलिस ठाण्यात ठाणेदारपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी या पोलिस ठाण्याचा कायापालट करण्याचा निर्धार केला. अशातच शासनाकडून स्मार्ट पोलिस ठाण्याकरिता जिल्ह्यातून या पोलिस ठाण्याची निवड करण्यात आली. यावेळी मुंडे यांनी इतर कर्मचाºयांच्या सहकार्याने संपूर्ण सोयी सुविधा उपलब्ध करून इमारतीचे निर्माण पंचतारांकित हॉटेलसारखे करून विदर्भात प्रथम स्मार्ट पोलिस ठाण्याचा बहुमान प्राप्त करीत आय.एस.ओ मानांकन मिळविले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा.मेघश्याम ढाकरे यांनी केले. पोलिस ठाण्याला बहुमान मिळवून देण्याकरिता सर्वांनी केलेल्या कामाचे ठाणेदार मुंडे यांनी आभार व्यक्त केले. या समारोहाच्या आयोजनाकरिता पोलिस उपनिरीक्षक मिलिंंद पारडकर, माधुरी गायकवाड, दीपेश ठाकरे, अरविंद येनुरकर, बादल वानकर, स्वप्नील वाटकर, वैभव चरडे, राजू जयसिंगपुरे, विरु कांबळे, आशीष गेडाम, महेंद्र शिरोडे, दिनेश तडस यांच्यासह ठाण्यातील इतर पोलिस कर्मचाºयांनी सहकार्य केले.