आरक्षणाबाबत समता परिषदेने स्पष्ट केली भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:54 PM2018-04-12T23:54:27+5:302018-04-12T23:54:27+5:30
महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जावे. राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षणाबाबत नागपूर येथे रवी भवनात जनसुनावणी होती. यावेळी समता परिषदेच्या सदस्यांनी सदर भूमिका मांडली.
या जनसुनावनीत भुजबळ यांची भूमिकाच आयोगासमोर महात्मा फुले समता परीषदेच्यावतीने मांडण्यात आली. यात ओबीसींची बाजु लावुन धरली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेवु नये, यासाठी कायद्याची विविध उदाहरणे व आधार घेवुन, महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे यांनी ओबीसींची बाजू मांडली. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा आरक्षणाकरिता समावेश केल्यास लाभार्थ्यांची संख्या कमी होईल आधीच या प्रवर्गात सर्वाधिक जातींचा समावेश केला आहे. त्यामुळे मराठा समाजाकरिता स्वतंत्र प्रवर्ग करून मगच आरक्षण देण्याची भूमिका मांडली. यावेळी आयोगाला निवेदन देण्यात आले. समता परीषदेचे विनय डहाके, केशव तितरे, निळकंठ राउत आणि कार्यकर्ते उपस्थित होते.