Corona Virus in Wardha; समीर कुणावार यांच्यावर आली दूध काढण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 08:05 PM2020-03-27T20:05:16+5:302020-03-27T20:05:44+5:30

मोठ्या पदावर गेलो तरी आपला मूळ पिंड शेतीचा आहे, आपण हाडाचे शेतकरी आहोत याची जाण कुणावार यांनी ठेवली. त्यामुळेच त्यांना या कामातही आनंद मिळत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Sameer Kunawar busy in cow shed | Corona Virus in Wardha; समीर कुणावार यांच्यावर आली दूध काढण्याची पाळी

Corona Virus in Wardha; समीर कुणावार यांच्यावर आली दूध काढण्याची पाळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: राज्यामध्ये संचारबंदी सुरू असून अत्यावाश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचारी वगळता रस्त्यांवर कोणीही सर्वसामान्य नागरिक दिसत नाही अशा स्थितीत हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्याकडील गायींचे दुध काढणारा माणूस संचारबंदी मुळे येण्याचे टाळतो आहे...मग काय गायींचे दुध काढणे तर गरजेचे पण काढणार कोण....हा प्रश्र्न निर्माण झाला होता. आमदार कुणावार यांनी यावर तोडगा काढत स्वत: गाईचे दूध काढण्याचा निर्णय घेतला. शेतीतील व पशुपालन व्यवसायातील गडीमाणसं संचारबंदी लागू असल्याने येण्यास तयार नसल्याने आमदार कुणावार आता गेल्या काही दिवसांपासून स्वत: गाईचे दूध काढत आहेत. मोठ्या पदावर गेलो तरी आपला मूळ पिंड शेतीचा आहे, आपण हाडाचे शेतकरी आहोत याची जाण कुणावार यांनी ठेवली. त्यामुळेच त्यांना या कामातही आनंद मिळत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Sameer Kunawar busy in cow shed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.