बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम साने गुरुजींनी केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:34 PM2017-12-29T23:34:30+5:302017-12-29T23:34:47+5:30
गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.
गांधी १५० मध्ये साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. अ.भा. साने गुरूजी कथामाला कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी अवधूत म्हमाणे, डॉ. उल्हास जाजू, रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ व सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.
म्हमाणे पूढे म्हणाले की, गुरूजींनी ज्या गोष्टी लिहिल्या, त्या सर्व वैचारिक व प्रेरणादायी आहे. आज त्या सर्व बालक, युवकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. डॉ. जाजू यांनी गांधी विचार व गोष्टी सांगण्याच्या नव्हे तर समजून घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचा प्रश्न आज निर्माण झाला; पण तो होऊ नये यासाठी गांधीजींनी जो कार्यक्रम दिला, तो समजण्याची गरज आहे, असे सांगितले. रवींद्र रूख्मिनी पंढरीनाथ म्हणाले की, मी साने गुरूजींच्या गोष्टी सांगत असे; पण आज या गोष्टी सांगताना गांधीजींच्या विचारांच्या पे्रमात पडलो. आजही गांधीजींविषयी विष पसरविले जाते. खरा गांधी सांगून अमृत पसरविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. गांधीजींना चरखा, स्वच्छता यात बंदीस्त करण्यात आले. वास्तवात तर गांधी त्यापलीकडे आहे. गांधींना मारण्यासाठी ३२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. गांधीजींनी देशातील सर्व स्तरातील लोकांना जोडले, म्हणून त्या काळी काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकतेने राहिले. काँग्रेसचा जनाधार वाढला. संघाचा तर स्वातंत्र्य लढाईत कुठेच सहभाग नव्हता. उलट विरोध होता. यातूनच गांधी हत्या झाली. गुरूजींच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळचे बाळ सरोदे यांनी भक्तातील वेगळेपणा पाहिल्यास मूळ पुरूष गांधीजी दिसते. मनातील विरोधात्मक भिंती पाडा, गांधीजी व साने गुरुजींना समजून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी तर संचालन डॉ. शोभा बेलखोडे यांनी केले.