संगीता रामटेके यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

By admin | Published: September 3, 2016 12:08 AM2016-09-03T00:08:19+5:302016-09-03T00:08:19+5:30

नगर परिषदेतील सत्तारूढ गटातील सुंदोपसुदी, खुंटलेला विकास यामुळे नाराज होवून सत्तारूढ काँग्रेस समर्थक

Sangeeta Ramteke resigns as Corporator | संगीता रामटेके यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

संगीता रामटेके यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

Next

 पुलगाव : नगर परिषदेतील सत्तारूढ गटातील सुंदोपसुदी, खुंटलेला विकास यामुळे नाराज होवून सत्तारूढ काँग्रेस समर्थक अपक्ष नगरसेविका संगीता अरूण रामटेके यांनी शुक्रवारी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देत पालिकेला रामराम ठोकला.
प्रभाग ३ मधील वॉर्ड क्रं १३ मधून नागरिकांच्या इतर मागास प्रवर्गातून त्या निवडून आल्या. शहराच्या विकासाच्या दृष्टीने सत्तारूढ काँग्रेससोबत त्या सत्तेत होत्या. त्यांच्या राजीनाम्याचा राजकीय क्षेत्रात गंभीर परिणाम होवून सत्तारूढ काँग्रेसमधील काही नगरसेवकही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे. तसे झाल्यास भाजपाचे पाच नगर सेवकही आपल्या पदाचे राजीनामे देण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sangeeta Ramteke resigns as Corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.