बदनामीच्या वचप्यापोटी संजयची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:49 PM2017-11-21T23:49:46+5:302017-11-21T23:50:19+5:30

कारंजा तालुक्यातील नारा येथे संजय नामदेव देशमुख याची त्याच्या पे्रयसीच्या पतीने हत्या केली. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करूनच हत्येचा उलगडा केला.

Sanjay kills the murder of defamation | बदनामीच्या वचप्यापोटी संजयची हत्या

बदनामीच्या वचप्यापोटी संजयची हत्या

Next
ठळक मुद्देसात दिवसांची पोलीस कोठडी : काही तासात आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथे संजय नामदेव देशमुख याची त्याच्या पे्रयसीच्या पतीने हत्या केली. यातील आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक करूनच हत्येचा उलगडा केला. संजयची हत्या पत्नीला पळवून नेल्यामुळे झालेल्या बदनामीचा वचपा काढण्याकरिता केल्याची केल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
संजयचे गावातीलच एका महिलेशी सूत जुळले होते. ते दोघेही गत महिन्यात घरून पळून गुजरात येथे गेले होते. यामुळे झालेल्या बदनामीचा राग मनात धरून संजयच्या मारेकºयाने त्याला जीवानिशीच ठार केले. सदर प्रकरणी मृत संजयच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारेकºयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सावरडोह येथून त्याला मारेकºयाला अटक केली. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते काय, याचा शोध सुरू आहे.
आरोपी अन् मृत नातेवाईक
मृत संजय व अटकेत असलेला मारेकरी हे दोघेही नातेवाईक असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. शिवाय १५ वर्षांपूर्वी मृताच्या वडिलाचीही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
अटकेकरिता मोबाईल ठरला महत्त्वाचा
संजयची हत्या केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान पोलिसांनी संजयच्या मारेकºयाच्या मुलाला आपल्या ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलवर आरोपी सतत फोन करून घटनेनंतरच्या परिस्थितीची माहिती घेत होता. याच संधीचा फायदा घेत पोलिसांनी मोठ्या शिताफिने संजयच्या मारेकºयांला सावरडोह येथून अटक केली.

Web Title: Sanjay kills the murder of defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून