पाण्याअभावी रोपटे मरणासन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:24 PM2018-03-25T22:24:20+5:302018-03-25T22:24:20+5:30

शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत.

Sapling due to lack of water | पाण्याअभावी रोपटे मरणासन्न

पाण्याअभावी रोपटे मरणासन्न

Next
ठळक मुद्देवृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला खो : प्रशासकीय इमारत परिसरातील प्रकार

आॅनलाईन लोकमत
वर्धा : शहरातील सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात मोठा गाजावाजा करीत विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली;पण सध्या त्यांना साधे पाणी देण्याकडेही दुर्लक्ष केल्या जात असल्याने ही रोपटे शेवटची घटीका मोजत आहेत. हा प्रकार वृक्षसंवर्धनाच्या उद्देशाला खो देणारा ठरत असल्याने संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात विविधा केंद्रासह कामगार न्यायालय, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय, जिल्हा भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क विभाग आदी कार्यालये आहेत. त्यामुळे कार्यालयीन दिवसांमध्ये येथे जिल्ह्यातील गावागावातून विविध कामानिमित्त येणाºया नागरिकांची गर्दी असते. गत दोन वर्षांपासून वृक्षाचे महत्त्व ओळखून शासनस्तरावरूनही वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोठा गाजावाजा करीत प्रशासकीय इमारत परिसरात विविध प्रजातींची रोपटे लावण्यात आली. परंतु, रोपटे व वृक्ष संवर्धन कठडे लावूनच शासकीय सोपस्कार आटोपण्यात आल्याचे सध्या फेरफटका मारल्यावर दिसून येते.
सदर परिसरात लावण्यात आलेली अनेक रोपटे पाण्याअभावी करपल्याचे दिसून येतात. तर काही रोपटे पाण्याअभावी शेवटची घटीका मोजत आहेत. हरित वर्धा या उद्देशालाच या प्रकारामुळे पाठ दाखविल्या जात असल्याने याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी शहरातील वृक्षप्रेमींची आहे.
परिसराचे सौंदर्यीकरण केव्हा?
प्रशासकीय इमारत परिसर हरितमय करण्यासाठी काही विशिष्ट जागा आरक्षीत करण्यात आली आहे. परंतु, गत अनेक वर्षांपासून तेथे एकही वृक्ष लावण्यात आले नसल्याचे नागरिक सांगतात. प्रशासकीय इमारत परिसराचे सौंदर्यीकरण केव्हा होणार, असा प्रश्न शहरातील सुजान नागरिकांकडून विचारला जात आहे.
हरित वर्धेकडे पाठ
४सिव्हील लाईन भागातील प्रशासकीय इमारत परिसरात रोपटे पाण्याअभावी करपत आहेत. त्याकडे देखभालीची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयांचेही दुर्लक्ष होत असल्याने सुंदर व हरित वर्धेच्या उद्देशाकडेच पाठ दाखविल्या जात आहे. त्यामुळे याकडे लक्ष देत कार्यवाहीची गरज आहे.

Web Title: Sapling due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.