सराफा असोसिएशनचा मोर्चा

By admin | Published: March 12, 2016 02:31 AM2016-03-12T02:31:09+5:302016-03-12T02:31:09+5:30

शासनाच्या एक्साईज डयुटी विरोधात येथील सराफा व्यावसायिकांनी ४ मार्च पासून प्रतिष्ठाने बंद ठेवत बेमुदत बंद पुकारला.

The Sarafa Association's Front | सराफा असोसिएशनचा मोर्चा

सराफा असोसिएशनचा मोर्चा

Next

वर्धेत सभा : आठवड्यापासून विविध आंदोलनातून निषेध
वर्धा/हिंगणघाट/आर्वी : शासनाच्या एक्साईज डयुटी विरोधात येथील सराफा व्यावसायिकांनी ४ मार्च पासून प्रतिष्ठाने बंद ठेवत बेमुदत बंद पुकारला. यात शुक्रवारी हिंगणघाट येथे दुपारी सराफा असोसिएशनच्यावतीने मोर्चा काढून शासनाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला. वर्धेत याच संदर्भात सभा झाली. या सभेला माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. आर्वी शहरातही शुक्रवारी सराफा दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
वर्धेतील सराफा बाजार परिसरात येथील व्यावसायिकांच्यावतीने विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात गुरुवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी नागरिकांना संत्रे वा इतर साहित्य विकण्याचे आंदोलन त्यांच्यावतीने करण्यात आले होते. शुक्रवारी येथील सराफा ओळीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला माजी आमदार सुरेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनीही शासनाच्यावतीने आकारलेल्या कराचा विरोध दर्शविला. यावेळी सराफा असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंगणघाट येथील कारंजा चौकातून निघालेल्या या मोर्चात आकाश निनावे, खुशाल निनावे, विक्रम देवगिरकर, मयुर पोहेकर,सूरज ढोमणे, चेतन निनावे, बंडु सरोदे, सतीश ढोमणे, सुनील सरोदे, निलेश ढोमणे, शैलेश ढोमणे, नंदु सरोदे, संजु कासवा, अजीत मुनोत, विजय येवले, सचिन माळवी, आनंद देवगिरकर, दिनेश फटींग, शैलेश ढोमणे, सुभाष निनावे, दिलीप पोहेकर, राजु भरणे, प्रितम भरणे, शैलेश ढोमणे, अभिनंदन मुनोत, मनोज सोनी, अनुप कोठारी, अभय कोठारी, प्रभाकर ढोमणे, बापु भरणे, गजु निनावे, महेश निनावे, अनि निनावे, अशोक वर्मा आदी सहभागी होते. हा निषेध मोर्चा मोहता चौक, विठोबा चौक, डॉ. आंबेडकर चौक, महावीर चौकातून शासन विरोधात घोषणा देत कारंजा चौकात मोर्चाचा समारोप झाला. आर्वी शहरातही सराफा व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The Sarafa Association's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.