नागपूर जिल्ह्यातील सराईत चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:24 PM2019-01-03T22:24:34+5:302019-01-03T22:25:04+5:30
बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चोरट्याकडूनपोलिसांनी रोख आणि सोन्या-चांदीचा ऐवज जप्त केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने संशयित व्यक्ती संजय मधुकर मून, रा. नागपूर याला ताब्यात घेतले. मागील दोन महिन्यांपासून गुन्हे शाखेची चमू त्याच्या मागावर होती. अनेकवेळा त्याने पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी अनेकवेळा वर्धा जिल्ह्यात आला. सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धन्वंतरीनगर, वैशालीनगर, उगले ले-आऊट वरूड, सेवाग्राम आदी ठिकाणी घरफोडीचे २० गुन्हे केल्याची चोरट्याने कबुली दिली. २० पैकी १३ गुन्हे सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
२६ आॅगस्ट २०१८ ला रात्रीच्या सुमारास रूपेश अशोक ठोंबरे, रा. वरूड कपील वस्ती सोसायटी, हे कुटुंबासह झोपले असता चोरटयाने स्वयंपाकल खोलीच्या मागील दार, खिडकीतून हात टाकून कडी उघडत घरात प्रवेश करून बॅगमधील डबीतले सोन्याचे २ तोळयाचे गोफ अंदाजे किंमत ३० हजार रुपये, सोन्याची डिझाईन असलेली ४ ग्रॅमची अंगठी सोन्याचे मंगळसूत्र, रोख व इतर दागिने ७४ हजार १५० रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. याबाबत सेवाग्राम येथे गुन्हा दाखल होता. तपासाअंती संजय मून याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, उदयसिंग बारवाल, नामदेव किटे, परवेज खान, दिवाकर परिमल, नरेंद्र डहाके, हरिदास काकड, अमर लाखे, आनंद भस्मे, वैभव कट्टोजवार, सचिन खैरकर, अमित शुक्ला, कुलदीप टांकसाळे, नीलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, चालक आत्माराम भोयर आदींनी केली.
दोन महिन्यांपासून देत होता हुलकावणी
हा सराईत चोरटा कधी सुरक्षारक्षकाच्या वेशात, तर कधी एखाद्या अधिकाºयाप्रमाणे राहणीमान ठेवत घरफोड्या करायचा. तो नागपूरहून काजीपेठ या रेल्वेगाडीने येत वरुड येथे उतरायचा. रात्री चोºया केल्यानंतर दुसरे दिवशी सकाळच्या पॅसेंजरने परत जायचा. या दरम्यान पोलिसांनी त्याला गाठले असता अनेकवेळा त्याने दिशाभूल केली. मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.
तब्बल १५ वर्षे भोगली शिक्षा
आरोपीवर नागपूर येथे घरफोडीच्या ९८ तर सेवाग्राम ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत. ७ जणांनी घटनेची नोंदचे केली नाही. आरोपीने वेगवेगळया गुन्ह्यांत तब्बल १५ वर्षे शिक्षा भोगली आहे.