सरपंचासह पती, मुलगा व सचिव एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:30 PM2018-11-19T22:30:56+5:302018-11-19T22:32:18+5:30
नजीकच्या बरबडी येथील महिला सरपंच अनिता रामभाऊ शिवरकर (४४), रामभाऊ बिसन शिवरकर (५१), कैलास रामभाऊ शिवरकर (२३) व तेथील ग्रा.पं. सचिव कैलास पंचमलाल बर्धीया (५०) या चौघांना संगनमत करून २५ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या बरबडी येथील महिला सरपंच अनिता रामभाऊ शिवरकर (४४), रामभाऊ बिसन शिवरकर (५१), कैलास रामभाऊ शिवरकर (२३) व तेथील ग्रा.पं. सचिव कैलास पंचमलाल बर्धीया (५०) या चौघांना संगनमत करून २५ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, लाचखोर सरपंच अनिता शिवरकर, रामभाऊ शिवरकर, कैलास शिवरकर व ग्रा.पं. सचिव कैलास बर्धीया या चौघांनी बरबडी ग्रा.पं.च्या हद्दीत कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामाचा २ लाखांचा धनादेश काढण्यासाठी ३२ हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांना तक्रारकर्त्याने दिली. माहिती प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी सापळा रचून लाचखोर ग्रा.पं. सचिव कैलास बर्धीया याला २५ हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. तसेच बर्धीया यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एसीबीच्या अधिकाºयांनी बरबडीच्या महिला सरंपच अनिता शिवरकर, रामभाऊ शिवरकर, कैलास शिवरकर यांना ताब्यात घेतले. सदर चौघांविरुद्ध एसीबीच्या अधिकाºयांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दुधलवार यांच्या मार्गदर्शनात एसीबी वर्धाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब गावडे, पीआय ठाकुर, पीएसआय सुहास चौधरी, एएसआय रवींद्र बावनेर, रोशन निंबोळकर, अतूल वैद्य, सागर भोसले, खडसे, वालदे, कुचनकर, हिवाळे आदींनी केली.