सरपंचाच्या पतीकडून सदस्याला मारहाण

By admin | Published: June 24, 2014 12:02 AM2014-06-24T00:02:43+5:302014-06-24T00:02:43+5:30

समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

Sarpanch's husband beaten up | सरपंचाच्या पतीकडून सदस्याला मारहाण

सरपंचाच्या पतीकडून सदस्याला मारहाण

Next

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर ग्रा. पं. सदस्यास शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची औपचारिकताच पूर्ण केल्याने अद्याप कारवाई झाली नसल्याने ग्रा. पं. सदस्य रोशन लामसोंगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
निवेदनानुसार, जाम येथे रिना जांगडेकर या सरपंच पदावर असून तिचा पती अमोल जांगडेकर हा पत्नीच्या सरपंचपदाचा गैरवापर करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अमोल आधी रॉकेलचा धंदा करीत होता. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहे. ९ जून रोजी १२.३० वाजता ग्रा. पं. कार्यालयात वार्ड नं. १ मध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे ग्रा.पं. सदस्य रोशन लामसोंगे हे सचिवाला भेटायला गेले. यावेळी अमोलने आपण सरपंच असल्याचे म्हणत सचिवाला कशाला विचारता, जे विचारायचे आहे ते मला विचारा असे म्हणत एकाऐकी रोशनला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात त्याच्या डोळ्याला जबर जखम झाली. हा प्रकार सचिवासमोर घडला असताना त्यांनीही कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रा.प.सदस्य लामसोंगे यांनी घटनेची तक्रार ९ जून रोजी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी जांगडेकर विरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. व अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असल्याने आपणास कोर्टात जाण्याची समज देण्यात येते. अशी एन.सी. पावती पोलिसांनी दिली. परंतु अद्यापही जांगडेकर विरोधात कठोर पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे पत्नीच्या सरपंचपदाचा पदाचा गैरवापर करीत असलेल्या अमोल जांगडेकरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी लामसोंगे यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय चौधरी यांना देण्यात आली आहे. पदाचा असा गैरवापर करीत असलेल्या गुंंड प्रवृतीच्या इसमावर कठोर पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Sarpanch's husband beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.