मध्यप्रदेशातील सरपंचांनी जाणून घेतले ग्रामपंचायतीचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:51 PM2017-09-25T22:51:24+5:302017-09-25T22:51:46+5:30
मध्यप्रदेशातील बिलासपूर (छत्तीसगड) येथील पंच, सरपंचांनी महिला राजसत्ता आंदोलनांतर्गत नालवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मध्यप्रदेशातील बिलासपूर (छत्तीसगड) येथील पंच, सरपंचांनी महिला राजसत्ता आंदोलनांतर्गत नालवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावैळी सरपंचांनी ग्रामपंचायतीचे कामकाज, गाव, शाखा, आघाडीची संघटना आदी बाबी जाणून घेतल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लता टेकाम तर अतिथी म्हणून आंदोलन संस्थापक हेमलता साहू, पं.स. सदस्य चंदा सराम, रत्नमाला वैद्य, निर्मला आदी उपस्थित होते. यावेळी साहू यांनी ग्रा.पं. चा कारभार कसा चालतो याचे अध्ययन पंच, सरपंच यांना करता यावे म्हणून या भेटीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. महिला राजसत्ता आंदोलनामुळे ग्रा.पं. ची कार्यप्रणाली समजली, असे लता टेकाम यांनी सांगितले. प्रास्ताविक रत्नमाला वैद्य यांनी केले. संचालन उपसरपंच प्रज्ञा चहांदे यांनी केले तर आभार प्रतिभा वाळके यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक, पं.स. सदस्य साधना नितनवरे, ग्रा.पं. सदस्य भावना वाडीभस्मे, चंदा उके, वैभव सूर्यवंशी, महेश शिरभाते, पंकज काचोळे, गाव शाखा प्रमुख रिता बनकर, विमल वरखडे, वंदना आगलावे, सुजाता माटे, सिंधु जामगडे, प्रीती नितनवरे, शीला नितनवरे, शालू सोनटक्के, बांगडे, आशा वर्कर, प्रफुल्ल वाघमारे, अश्विन किल्लेकर, रवी टेंभरे, प्रशांत फुलझेले, विनीत नितनवरे, मधुकर शंभरकर, संतोष मोडक आदींनी सहकार्य केले.