सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:08 IST2018-12-30T00:08:02+5:302018-12-30T00:08:56+5:30

धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला.

Sarpanch's trickery, MLA's candy | सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी

सरपंचाची चलाखी, आमदारांची दांडी

ठळक मुद्देधानोली ग्रा.पं. भवनाचे लोकार्पण : भाजपचे सर्वच पदाधिकारी अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व कोनशिलेवर आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नावे टाकली व यात सरपंचाने खेळी करीत राष्ट्रवादीचे समीर देशमुख यांचे नाव टाकले. यामुळे आमदारासह भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला.
धानोली ग्रामस्थांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे विविध विकासकामासाठी निधी मागतांना ग्रामपंचायत इमारत जिर्ण झाल्याने नवीन इमारतीसाठी निधी मागितला. आमदारांनी तो उपलब्ध करुन दिला. ग्रामपंचायत निवडणूकीची आचार संहिता लागण्यापूर्वी लोकार्पण करण्यासाठी प्रयत्न करुन मुहूर्त ठरला. उद्घाटक म्हणून आमदार डॉ.पंकज भोयर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जि.प. सभापती सोनाली कलोडे, पं.स. सभापती जयश्री खोडे यांच्यासह स्थानिक जि.प.सदस्य व पं.स. सदस्यांची नावे टाकण्यात आली.
धानोलीच्या सरपंचाने राष्ट्रवादीचे समीर देशमुख यांचेही प्रमुख उपस्थितीत नाव टाकले.
आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करुन निधी उपलब्ध करुन दिल्यावर समीर देशमुखांचे नाव टाकल्याने आमदारांनी प्रयत्न करुन उपलब्ध केलेल्या निधीचे श्रेय राष्ट्रवादीचे देशमुख यांना देण्यामागचे राजकारण आमदारांना पटले नाही. लोकार्पण सोहळ्याला आमदारासह निमंत्रण पत्रिकेवरील एकही पदाधिकारी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही.
सरपंचाने चुक केली मात्र समीर देशमुखांना ती कशी कळली नाही. अशी खदखद आमदारांना वाटली. देशमुख व भोयर यांच्या राजकीय वैमनस्य आहे हे जगजाहीर असताना आमदाराच्या कार्यक्रमात देशमुख उपस्थित राहणार नाही अशी अटकले बांधले जात असताना समीर देशमुख उपस्थित झाले. यामुळे आमदार व भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला अघोषित बहिष्कार टाकला.
समीर देशमुख यांच्या हस्ते व जि.प. सदस्या सुमित्रा मलगाम यांच्या उपस्थितीत लोकर्पण अर्ध्या तासात करुन कार्यक्रमाला गाशा गुंडाळला. सध्या आमदार डॉ. पंकज भोयर सेलू तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन विकास निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे पक्षीय राजकारण आणणाºया धानोलीच्या या प्रकाराने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. व धानोलीच्या घटनेचे हसे झाले आहे.

Web Title: Sarpanch's trickery, MLA's candy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.