निवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह चौथ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:46 PM2017-10-14T23:46:44+5:302017-10-14T23:46:54+5:30

जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही.

Satyagraha of retired employees continued on the fourth day | निवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह चौथ्या दिवशीही सुरूच

निवृत्त कर्मचाºयांचा सत्याग्रह चौथ्या दिवशीही सुरूच

Next
ठळक मुद्देज्येष्ठांचा ‘लढा’ : समस्या सोडविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करून शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रहाचा मार्ग पत्करला असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर अद्यापही तोडगा न काढण्यात आल्याने शनिवारी चौथ्या दिवशी सदर बैठा सत्याग्रह आंदोलन सेवाग्राम आश्रम परिसरात सुरू होते.
सेवाग्राम आश्रमासमोर असंघटीत सर्व जिल्हा भूविकास बँक सेवानिवृत्त कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ केला आहे. २००७-०८ पासून सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांची देय ग्रॅज्युटी अधिक रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त भत्ता न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित अदा करावा, २०१० पासून स्वेच्छा निवृत्ती, नियमित सेवानिवृत्ती, राज्य शासनाच्या ३ आॅगस्टच्या निर्णयानुसार कार्यमुक्त केलेल्या सेवानिवृत्तांची ग्रॅज्युटी, रजेचे वेतन, प्रलंबित अतिरिक्त निर्देशांक महागाई भत्ता, प्रलंबित नियमित वेतन, स्वेच्छा निवृत्तीची नुकसान भरपाई तसेच २००१ ते २००९ या कालावधीतील महागाई भत्ता त्वरित द्यावा आदी मागण्यासाठी जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक सेवानिवृत्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्त्वा सदर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर चौथ्या दिवशीही तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन शनिवारी सुरू होते. आंदोलनात सतीश काळे, अशोक मगर, सागर कुत्तरमारे, मधुकर प्रांजळे, सुरेश रहाटे, वानखेडे, चित्रकला रहाटे आदी सहभागी झाले आहेत.
अन्नत्याग करून नोंदविणार निषेध
जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्याने सेवानिवृत्त कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी रविवार १५ आॅक्टोबरला अन्नत्याग करून खेद व्यक्त करणार आहेत.

Web Title: Satyagraha of retired employees continued on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.