वर्धा : आज पासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार सावरकर गौरव यात्रा
By अभिनय खोपडे | Published: April 3, 2023 06:46 PM2023-04-03T18:46:54+5:302023-04-03T18:47:10+5:30
एकपात्री नाटक, लेझीम पथक, रथ दिंडी, व पायदळ यात्रा चा समावेश असेल.
वर्धा - स्वातंत्र वीर सावरकर यांच्या जीवन प्रवासाची तसेच देशाला स्वतंत्र मिळून देण्यासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाची माहिती सर्वांना होण्याकरिता तसेच विरोधकांना सावरकर व भारत मातेचे क्रांतिकारक चारित्र्य समजावून सांगण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पासून संपूर्ण जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
अनेक विविध गुणांनी परिपूर्ण असलेले दुर्मिळ व्यक्तीमत्व म्हणजे वीर सावरकर थोर क्रांतिकारक, प्रखर देशभक्त, थोर कवी, भाषाकर, जेस्ट साहित्यिक असलेले सववरकर वर विरोधक नेहमीच खालील पातळीवर जाऊन टीका करतात. या विरोधकांना सावरकर व भारत मातेचे क्रांतिकारक समजावून सांगण्यासाठी सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर यात्रा आज वर्धा शहरातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता सावरकर स्मारक, पावडे चौक, तुकडोजी महाराज चौक (आर्वी नाका) व समारोप सावरकर स्मारक. तसेच देवळी शहरातून सुद्धा हि यात्रा गांधी चौक ते आठवडी बाजार या मार्गाने असेल. दिनांक ५ एप्रिल ला हिंगणघाट येथील बाजार चौक ते गोकुलधाम मैदान, तर पुलगाव येथे नगरपालिका ते दखने फ़ैल असा यात्रेचा मार्ग राहील. आर्वी शहरात हि यात्रा दिनांक ८ एप्रिल ला असून मानकर सभागृह ते गांधी चौक असा यात्रेचा मार्ग राहील. यात सावरकर यांच्या जीवनावर आधारित झाकीचा यात समावेश असणार आहे.
तसेच एकपात्री नाटक, लेझीम पथक, रथ दिंडी, व पायदळ यात्रा चा समावेश असेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रति निष्ठा ठेवून नागरिकांनी सदर यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सावरकर गौरव समितीने केले आहे.