जल, जमीन, जंगल बचाओ मोहीम लोकचळवळ व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:22 PM2018-03-25T22:22:16+5:302018-03-25T22:22:16+5:30
आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आज वनांची संख्या रोडावत आहे. निसर्गसंपदा वाचविणे काळाची गरज आहे. यासाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच एन. सी. सी. छात्र सैनिक, रोव्हर्स व रेंजर्स यांनीही पुढे आले पाहिजे. जल, जमीन, जंगल बचाओ ही मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी स्थानिक एन.सी.सी. परेड मैदानात आयोजित विशेष कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. सी. सी. चे समादेशक अधिकारी कर्नल पद्यभान जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, इमरान राही, प्रा. किशोर वानखेडे, संजय इंगळे तिगावकर, प्रा. संतोष मोहदरे, प्रा. जगदीश यावले, प्रकाश डाखोळे, संतोष तुरक, प्रा. मोहन गुजरकर यांची उपस्थिती होती. यावेळी तीन दिवसीय ११४ कि.मी.च्या जनजागृतीपर सायकल यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. या यात्रेचे देवळी शहरात स्वागत करण्यात आले. यावेळी देवळीच्या नगराध्यक्षा सुचिता मडावी, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तर सालोड येथे प्रहार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायकल स्वारांचे स्वागत करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. सुरगाव येथे गुरूदेव सेवा मंडळातर्फे प्रविण देशमुख महाराज यांच्या प्रमुख उपस्थित जनजागृतीपर सायकल यात्रेतील तरुणांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधनात्मक नाटीका सादर करण्यात आली.
५४ कि.मी.चा प्रवास करून ही यात्राला बोर वाघ्र प्रकल्प येथे पोहचली. तेथे वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर तळवेकर यांनी तरुणांचे स्वागत केले. त्यानंतर परतीचा प्रवास करताना रिधोरा धरण परिसरात ही जनजागृतीपर सायकल यात्रा पोहोचली असता तेथेही स्वागत करण्यात आले. त्यानंतर जामणी येथे दिनकर विद्या मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रबोधनात्मक उपक्रम सादर करण्यात आला. २३ मार्चला जागतिक वायूदिन व शहीद दिवस पर्वावर सायकल अभियानाचे देवळी येथे समारोप झाला.
सदर अभियानाचे नेतृत्त्व कॅप्टन मोहन गुजरकर, प्रा. किशोर वानखेडे यांनी केले. यात स्वप्नील शिंगाडे, धिरज कामडी, निहाल झाडे, लोभास उघडे, स्वप्नील मडावी, योगेश आदमने, तेजस झाडे, राजेश सुरजुसे, श्रीकांत गणवीर, संकेत काळे, अनिकेत डुकरे, स्वप्नील कडू, विक्की थुल, निलेश नेहारे, प्रतिकेश चितळकर, प्रा. रविंद्र गुजरकर, संकेत हिवंज, रितिक झाडे, विवेक दोंदल, राहुल कामडी, प्रज्वल जांभुळकर, मयुर चंदनखेडे, तुषार झाडे, रितिक बलवीर, गणेश मोरे, आकाश ऐकोणकर, शिवम भुते, रितीक कळमकर, रूपाली मुगंले, प्रगती एकोणकर, प्रणाली साबळे, पुनम बैस, पूजा घोडे, प्रतिक्षा ऐकोणकर आदी सहभागी झाले होते. या सायकल यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना जल, जमीन, जंगल याचे महत्त्व पटवून देण्यात आले.