बचत गटांनी गृह उद्योगांतून बाहेर पडावे

By admin | Published: July 21, 2016 12:41 AM2016-07-21T00:41:09+5:302016-07-21T00:41:09+5:30

महिला बचत गटांनी लोणचे, पापड यासारख्या गृहउद्योगातून बाहेर पडून कृषी आधारित प्रकिया उद्योग उभारण्यासाठी एक पाऊल पूढे टाकावे.

Savings groups should exit the home business | बचत गटांनी गृह उद्योगांतून बाहेर पडावे

बचत गटांनी गृह उद्योगांतून बाहेर पडावे

Next

शैलेश नवाल : ‘गुणवत्ता प्रबंधन मानके आणि प्रौद्योगिक उपकरण’ यावर एकदिवसीय कार्यशाळा
वर्धा : महिला बचत गटांनी लोणचे, पापड यासारख्या गृहउद्योगातून बाहेर पडून कृषी आधारित प्रकिया उद्योग उभारण्यासाठी एक पाऊल पूढे टाकावे. तुमच्या पुढाकारातूनच गावात उद्योगाचे वातावरण तयार करून तुम्ही गावाला नवा मार्ग दाखवू शकता. यासाठी प्रशासनाच्यावतीने सर्व सहकार्य देण्याची हमी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
सुक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एमएसएमई विकास संस्था नागपूर, जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उद्योजक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका हॉटेलमध्ये गुणवत्ता प्रबंधन मानके आणि प्रौद्योगिक उपकरण यावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला एमएसएमईचे संचालक पी.एम. पार्लेवार, एमआयएचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, विषयतज्ञ सुरेंद्र चोप्रा, डॉ. प्रा. विनोद गोरंटीवार, एमएसएमईचे सहायक संचालक व्ही. जी. निखाडे, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पूढे म्हणाले की, ही कार्यशाळा जिल्ह्यातील लघुउद्योजक व बचत गटामार्फत चालविण्यात येणारे गृहउद्योग यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबी माहिती होण्यासाठी आयोजित आहे. उद्योग सुरू करायचा असलेल्यांनी सर्व शंकांचे निरसन विषयतज्ञांकडून करून घ्यावे, असे सांगितले.
हिवरे यांनी उपस्थितांना बँकेचे कर्ज वेळेत परतफेड केल्यासच यशस्वी उद्योजक होता येते. बँकेचे कर्ज घेताना अटी व शर्ती वाचूनच सही करावी आणि नवा उद्योग सुरू करताना सर्वेक्षण करूनच सुरू करावा, अशा सूचना केल्या. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा यांनी जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५६९ लोकांना मुद्रा लोण वाटप केले असून मुद्रा लोण स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया सारख्या कर्ज योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला लघुउद्योजक तथा आत्माचे प्रकल्प उपसंचालक दीपक पटेल, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. संचालन करीत आभार निखाडे यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)

ंलघु उद्योग क्षेत्र रोजगार निर्मितीत देशात द्वितीय
लघु उद्योग क्षेत्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार निर्मिती क्षेत्र आहे. जपान, चीन सारखे देश लघु उद्योगामुळे विकसित झाले. यामुळेच लघु उद्योग क्षेत्राला विकसित करण्यासाठी स्टार्अअप इंडिया, कौशल्य भारत, मुद्रा लोण आदी योजना सुरू करण्यत आला. कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विकास संस्था मदत करू शकते. वर्धा जिल्ह्यातही उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केले जातील, असे पार्लेवार यांनी सांगितले.

Web Title: Savings groups should exit the home business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.