परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Published: March 23, 2017 12:44 AM2017-03-23T00:44:29+5:302017-03-23T00:44:29+5:30

गोठ्यात बांधलेल्या ६ बकऱ्यांच्या गळ्याला चावा घेतला तर त्याचवेळी कुत्र्याचा गळाही या बिबट्याने पकडला.

The scare of terror in the area | परिसरात बिबट्याची दहशत

परिसरात बिबट्याची दहशत

Next

घोराड/बोरधरण : गोठ्यात बांधलेल्या ६ बकऱ्यांच्या गळ्याला चावा घेतला तर त्याचवेळी कुत्र्याचा गळाही या बिबट्याने पकडला. यात ४ बकऱ्या खुट्यांला बांधून असतानाच मृत्यूमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्याने सकाळी सेलू येथील वनविभागाच्या कार्यालयाला माहिती दिली. क्षेत्रसहायक एस.टी. लटपटे, पशुवैद्यकीय अधिकारी मून यांनी सकाळी १०.३० वाजता घटनास्थळ गाठून पंचनामा केला. डॉ. मून यांनी जखमी बकऱ्या व कुत्र्यावर उपचार केले.
सदर बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यातच ठार झाल्याचे क्षेत्रसहायक लटपटे यांनी सांगितले. नुकसानीचा मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकऱ्याने वनविभागाकडे केली आहे. गावालगतच बिबट्याचा मुक्तसंचार पाहता शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एक वर्षापूर्वी गावापासून एक किती अंतरावर खापरी रस्त्यावर तरसाचा मृत्यू झाला होता. यामुळे या शिवारात वाघाची दहशत आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील जुनवानी शिवारात गोठ्यात बांधून असलेल्या गोऱ्ह्यावर बिबट्याने हल्ला केला. यात गोऱ्हा ठार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. हिंगणी परिसरात २४ तासांत ही दुसरी घटना असल्याने शेतकरी, शेतमजूर भयभित आहे.
पहिली घटना सोनेगाव शिवारात रविवारी घडली. जुनवाणी शिवारात बाबाराव मुडे यांच्या शेतातील गोठ्यावर बिबट्याने हल्ला करीत गोऱ्हा ठार केला. गोऱ्ह्याला गोठ्याबाहेर फरफटत आणले. त्याच्या पोटाचा भाग फोडलेल्या अवस्थेत होता. गोठ्यात १५ ते २० जनावरे बांधून होती.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे अन्य गुरांनी भयभित होऊन दावणी तोडत पळ काढला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मंगळवारी सकाळी बाबाराव शेतात गेले असता हा प्रकार उघड झाला. त्यानी त्वरित हिंगणी वनविभागाला माहिती दिली. क्षेत्रसहायक गणेश कावळे, वनरक्षक सुनील कोटजावरे, तुपे, डॉ. भोयर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला गोऱ्हा गावराणी जातीचा असून शेतकऱ्याचे यात ३० हजारांचे नुकसान झाले. या घटनांमुळे सर्वत्र दहशत पसरली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)

Web Title: The scare of terror in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.