वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:41 AM2017-12-18T00:41:04+5:302017-12-18T00:42:43+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे.

Schedule allergies to the students | वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

वेळापत्रकाच्या अ‍ॅलर्जीने विद्यार्थ्यांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देनोकरदारांचे ‘शेड्यूल’ही प्रभावित : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या उदासिन धोरणामुळे विद्यार्थी, नोकरदार तथा प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील पाचही आगारांतील वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, एकही बस वेळेवर सुटत नसल्याचे चित्र आहे. परिवहनचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता शहरांतील शाळा, महाविद्यालये गाठताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा आधार घ्यावा लागतो. वर्धा हे जिल्हास्थळ असल्याने देवळी, सेलू, खरांगणा (मो.), कानगाव, वायगाव (नि.), रोहणा तथा अन्य ग्रामीण भागातील विद्यार्थी येथे उच्च शिक्षणासाठी येतात. यासाठी त्यांना बसचा प्रवास करावा लागतो. महामंडळाने विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना परिवहनचा प्रवास सोईस्कर पडतो; पण बसेसचे वेळापत्रक पाळले जात नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर येत आहे.
पुलगाव, आर्वी, हिंगणघाट, वर्धा व तळेगाव (श्या.पं.), असे जिल्ह्यात पाच आगार आहेत. या आगारांतून सुटणाºया बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. यामुळे जिल्ह्यात कुठेही बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे दिसून येते. परिणामी, विद्यार्थी, नोकरदार यांचे ‘शेड्यूल’ प्रभावित होत आहे. नोकरदार व्यक्तींना कार्यालयात तर विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात पोहोचायला वेळ होतो. यात त्यांना नुकसानही सोसावे लागते.
परिवहन महामंडळाने वेळापत्रक पाळत वेळेवर बसेस सोडण्याची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे; पण परिवहनला वेळापत्रकाची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
सकाळची बस दुपारी तर सायंकाळची बस रात्री उशिरा
आर्वी - तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे शैक्षणिक फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील गावांतून मोठ्या प्रमाणात प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येतात. येथे येण्याकरिता एसटीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. यातच एसटीचे अधिकारी, कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याने शाळा, महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
सकाळी १०.३० वाजता गावात पोहोचणारी बस दुपारपर्यंतही पोहोचत नाही. सायंकाळी ५ वाजताची आर्वी येथून सुटणारी बस रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोडली जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचालयाही वेळ होतो आणि परतीचा प्रवास करतानाही ताटकळ होते. रात्री ९ ते १० वाजता विद्यार्थी घरी पोहोचत आहेत. यात विशेषत: मुलींचे पालक ती घरी परतली नाही म्हणून गावातील प्रवासी निवाºयांवर प्रतीक्षा करताना दिसतात. हे चित्र तालुक्यात नित्याचे झाले आहे. अद्याप बस का आली नाही, याबाबत दूरध्वनीवर चौकशी केली असता उद्धट उत्तरे दिली जातात. या सर्व बाबींमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांमध्ये एसटीबाबत रोष निर्माण झाला आहे. याचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्कसपूर येथे सकाळी १०.३० वाजता पोहोचणारी बस आणि सायंकाळी ५ वाजताची बस कधीही वेळेवर येत नाही. निंबोली (शेंडे) येथे तर फारच बिकट परिस्थिती आहे. या गावाला जाण्याकरिता असलेली बस महिन्यातील निम्मे दिवस नादुरुस्त असते. शिवाय आर्वी तालुक्यातील संपूर्ण गावांत अशीच स्थिती आहे. याबाबत सरपंच संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी आगार आणि एसटी व्यवस्थापन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ग्रामीण भगातील बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील बसफेºया वेळेवर न सोडल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.

Web Title: Schedule allergies to the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.