शाळेचे कुलूप उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 11:54 PM2017-09-06T23:54:40+5:302017-09-06T23:54:53+5:30

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाने विद्यार्थ्याला मारहाण केली. यामुळे संतप्त पालकांनी कासारखेडा शाळेला कुलूप ठोकले. बुधवारी ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी समजूत काढल्याने कुलूप उघडले गेले.

The school lock is opened | शाळेचे कुलूप उघडले

शाळेचे कुलूप उघडले

Next
ठळक मुद्देठाणेदारांची मध्यस्थी : सभापती, सदस्य धडकले

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाने विद्यार्थ्याला मारहाण केली. यामुळे संतप्त पालकांनी कासारखेडा शाळेला कुलूप ठोकले. बुधवारी ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी समजूत काढल्याने कुलूप उघडले गेले. पालकांचा संताप पाहून अध्यक्षाने पळ काढला होता. याबाबत मुख्याध्यापक गुणवंत वाके यांनी खरांगणा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष अरविंद सुरेश लिचडे याने सोमवारी शाळेत मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना मारहाण केली. याची चर्चा होताच आर्वी पं.स. सभापती शिला पवार, जि.प. सदस्य राजश्री राजू राठी गटशिक्षणाधिकारी मुनघाटे, विस्तार अधिकारी जिट्टावार, केंद्रप्रमुख घुमडे यांनी भेट देत चौकशी केली. पालक व विद्यार्र्थ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. मंगळवारी विद्यार्र्थ्यांनी तर आज मुख्याध्यापक वाके यांनी रितसर तक्रार केली. अध्यक्ष लिचडे याच्यावर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालक करीत आहेत.
सोमवारी चाचणी परीक्षा सुरू असताना हा प्रकार घडला; पण मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या वरिष्ठांना माहिती दिली. यामुळे संतप्त पालकांनी मंगळवारी पोलीस ठाणे गाठल्याने विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. ठाणेदार रामटेके यांनी बुधवारी मुख्याध्यापक, शिक्षक प्रवीण भट, नीशा हजारे, रेखा ताकसांडे तथा सहा. उपनिरीक्षक अरुण भाजीपाले यांनी भूषण महाजन, गौरव वडे, योगेश वडे, आदेश कठाणे, आदित्य पाचपोर, तुषार मिटकर, निकेश बेनपे, सौरभ काळसर्पे, आरती गायकवाड यांचे बयान नोंदविले. अध्यक्ष लिचडे फरार असून तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The school lock is opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.