शाळेच्या आवारात विक्षिप्त, विकृतांचा वावर
By admin | Published: January 6, 2017 01:27 AM2017-01-06T01:27:21+5:302017-01-06T01:27:21+5:30
शाळांमध्ये चिमुकल्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असते. खासगी
सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह : चिमुकल्यांचे आरोग्यही धोक्यात
प्रशांत हेलोंडे ल्ल वर्धा
शाळांमध्ये चिमुकल्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असते. खासगी संस्थांच्या शाळांमध्ये याकडे प्रकर्षाने लक्षही दिले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची सुरक्षितता वाऱ्यावरच असते, ही बाब सर्वश्रूत आहे. शहरातील एका शाळेच्या आवारात चक्क विक्षिप्त, विकृतांचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे शाळांची सुरक्षितता व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषदांच्या शाळांमध्ये सामान्यांची मुले शिक्षणासाठी येतात. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सध्या भरघोस प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या काही शाळांचे रूपडेही पालटले आहे. काही शाळांत अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत तर कुठे नवीन शिक्षण पद्धतींचा अवलंब करीत विद्यार्थी व शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे प्रयत्न होत आहे. या तुलनेत नगर परिषदांच्या शाळा मात्र कमकुवत ठरत असल्याचेच दिसून येत आहे. नगर परिषदांच्या शाळांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शाळेच्या आवारात विक्षिप्त, विकृतांचा वावर असल्याचे गुरूवारी पाहावयास मिळाले. शहरातील जिल्हा कारागृहासमोर नगर परिषदेची मोतीलाल नेहरू हिंदी प्राथमिक शाळा आहे. या शाळेला मोठी सुरक्षा भिंत असून त्याचे फाटकही उंच आहे. असे असले तरी या शाळेच्या आवारात विक्षिप्त महिलेचा वावर असल्याचे पाहावयास मिळाले.
ही महिला रात्री या शाळेच्या आवारात वास्तव्यास असते. गुरूवारी सकाळी सदर महिला नग्न अवस्थेत उभी होती. नळ आल्याने आंघोळ केल्यानंतर ती त्याच अवस्थेत शाळेच्या आवारात उभी होती. दरम्यान ती काही लोकांना दिसताच आतमध्ये जाऊन कापड परिधान करून शाळेच्या बाहेर पडली. पहाटे दिसून आलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत होते. सदर महिला मनोविकृत नसून केवळ सोंग घेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींचे मत आहे. सदर महिलेचे साहित्यही शाळेच्या आवारातच होते. या प्रकारामुळे शाळांची सुरक्षितता आणि स्वच्छता धोक्यात आली आहे.
रात्रीच्यावेळी सुरक्षेचा अभाव
४स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये रात्री सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसते. शिवाय शाळांचा आवारही विशेष सुरक्षित केला जात नाही. परिणामी, कुणीही त्या शाळांच्या आवारामध्ये सहज जाऊ शकतो. यामुळेच या शाळा विक्षिप्त, विकृतांचा आश्रय बनल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार थांबविण्याकरिता शाळा प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
दोन ठिकाणांहून गेट
४नगर परिषदेच्या मोतीलाल नेहरू हिंदी प्राथमिक शाळा पोलीस मुख्यालयाला लागून अत्यंत सुरक्षित स्थळी आहे. समोर जिल्हा कारागृह व आजूबाजूला पोलिसांची वस्ती आहे. या शाळेतही विकृत, विक्षिप्त आपले चाळे करीत असतील तर आश्चर्य वाटणारच. या शाळेचे मुख्य गेट व भिंत मोठी असून मागून पुन्हा एक गेट आहे. दोन रस्ते असल्याने शाळेचा आवार गाठता येतो. परिणामी, कुणीही शाळेच्या आवारात शिरून चाळे करीत असल्याचे दिसते.
नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे
४नगर परिषदेच्या बहुतांश शाळांची सुरक्षितता आणि स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठे कुंपण भिंत आहे तर गेट नाही आणि दोन्ही आहे तर स्वच्छता नाही, असा प्रकार आहे. शिवाय विकृत, विक्षिप्त शाळांच्या आवारात राहिल्यास ते घाण करून ठेवतात. यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत शाळांच्या सुरक्षितता व स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.