सेवाग्रामात शाळेचा रस्ता हरविला चिखलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:04 PM2018-07-17T22:04:38+5:302018-07-17T22:04:55+5:30
ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंप ते सनशाईन शाळा मार्गावर संपूर्ण चिखल झाल्याने, खड्डे पडले रहिवाश्यासह विद्यार्थ्यांना येणे जाणे कठीण झाले आहे. डांबरी मार्ग चिखलात हरविल्याने नागरिक संतप्त आहेत.
सेवाग्राम वर्धा मार्गावर आदर्श नगर परिसर असून पेट्रोलपंपा समोरून सनशाईन शाळेकडे मार्ग गेलेला आहे.आदर्श नगरवासियांना तसेच आय.टी.पार्कचे एक प्रवेश व्दार या मार्गावर आहे.
या भागाचा आता विस्तार होत असून आय.टी.पार्क मुळे या भागाचे महत्त्व वाढले आहेत. पण हा संपूर्ण भाग आदर्श नगर प्रभाग तीन मध्ये मोडल्या जातो.विस्तार होत आहे आणि महत्व पण वाढत असले तरी मूलभूत सुविधा देण्यास ग्रा.पं. प्रशासन अपयशी ठरले आहे.२०१४मध्ये विकासाचे स्वप्न जनतेने पाहिले होते.पण इतक्या वर्षात आदर्श नगर वासियांच्या नशिबी काहीच आले नाही.
शाळा आणि निवासस्थाना मुळे या मार्गावर आवागमन वाढले आहे.या डांबर रोडवरील खड्डे आणि चिखला मुळे जाने येणे कठीण झाले.पावसामुळे घसरण्याचे प्रमाण वाढले. सायकल,दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे.बहुसंख्य रहिवासी आणि विद्याथी पायदळ किंवा सायकलने या मार्गाने मार्गक्रमन करीत असतात.पावसाने मार्गांची वाट लावल्याने लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या मार्गाची तत्काळ दुरस्ती करावी अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.
बापूच्या भूमीत केवळ आराखड्यासाठी निधी
राष्ट्रपिता महात्मा गांधीची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामच्या विकासाकरिता आराखड्यात निधी मंजूर करण्यात आला. यातून आश्रम परिसराचा विकास होणार आहे. सेवाग्रामवासीयाच्या नशीबी मात्र नरक यातनाच आहे. गावाचा विस्तार झपाट्याने होत असताना नागरी सुविधेसाठी मात्र पैसा आलेला नाही.
२०१६-१७ मध्ये सिमेंट रोड मंजूर झाला आहे. आणि कामाचा करारनामा २०१८ मध्ये झालेला आहे. रोड कामाला प्रारंभ होणे अपेक्षित आहे.
-संजय गवळी, उपसरपंच ग्रा.पं.सेवाग्राम.