शाळेत धुडगूस घालून विद्यार्थ्यांना केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:11 AM2017-09-06T01:11:48+5:302017-09-06T01:12:07+5:30

कासारखेडा येथील जि.प. शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद लिचडे यांनी मद्यधुंद अवस्थेत शाळेत चांगलाच धुडगुस घातला. दिसेल त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण केली.

In the school, they used to rubbish the students and beat them | शाळेत धुडगूस घालून विद्यार्थ्यांना केली मारहाण

शाळेत धुडगूस घालून विद्यार्थ्यांना केली मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्दे मद्यधुंद शाळा समिती अध्यक्षाचा प्रताप : विद्यार्थ्यांसह पालक धडकले पोलीस ठाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : कासारखेडा येथील जि.प. शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद लिचडे यांनी मद्यधुंद अवस्थेत शाळेत चांगलाच धुडगुस घातला. दिसेल त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे यात पहिलीत शिकणारा विद्यार्थीही सुटला नाही. सोमवारी हा सर्व प्रकार घडत असताना मुख्याध्यापक अवाक् होवून पाहत होते.
या प्रकरणी मुख्याध्यापक पोलिसात तक्रार करतील म्हणून पालक शांत होते; पण मुख्यध्यापकाने तक्रार न केल्यामुळे मंगळवारी पालक विद्यार्थ्यांसह ठाण्यात धडकले. यात भुषण महाजन वर्ग सात, गौरव वडे वर्ग सात, योगेश वडे वर्ग चौथी, आदेश कठाणे वर्ग सहावी, आदित्य पाचपोर वर्ग पहिला, तुषार मिटकर वर्ग सहावी, निकेष बेनपे वर्ग सातवी, सौरभ काळसर्पे वर्ग सातवी, हर्षदा बोंदरे वर्ग तीसरी, नेहा खंणार वर्ग पहिला, आरती गायकवाड वर्ग पाचवा यांनी ठाणेदार निशीकांत रामटेके यांची भेट घेतली.
एएसआय अरुण भाजीपाले यांनी नेहा खंगार व हर्षदा बोंदरे यांची तक्रार नोंदवून सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय शारीरिक चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्र खरांगणा येथे केली. कासारखेडा येथे वर्ग पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहे. पाच शिक्षक असून पटसंख्या ११५ आहे. हा सर्व प्रकार घडत असताना मुख्याध्यापक गुणवंत वाके, शिक्षक प्रवीण भट हे बघ्याच्या भूमिकेत होते. शिक्षिका निता हजारे व रेखा ताकसांडे या सुद्धा घटनेवेळी शाळेत उपस्थित होत्या तर एक शिक्षिका रजेवर होती. खरांगणा पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे पालकांचे लक्ष आहे.

दुपारी ३ वाजताच्या सुमारास अध्यक्ष अरविंद लिचडे हे दारुच्या नशेत शाळेत आले व एकाएकी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मी आमच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसात तक्रार केली नाही ही माझी चुक मी मान्य करतो. नंतर मी अध्यक्षांना घरी नेऊन दिले.
- गुणवंत वाके, मुख्याध्यापक जि.प. उच्च प्राथमिक शाळा, कासारखेडा.

विद्यार्थ्यांचे व पालकांचे बयान नोंदविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बयान व डॉक्टरचे मेडिकल प्रमाणपत्राचे आधारे गुन्हा दाखल करण्यात येईल.
- निशीकांत रामटेके, ठाणेदार, खरांगणा.
 

Web Title: In the school, they used to rubbish the students and beat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.