स्काऊट्स-गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’वर आधारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:54 PM2018-01-11T23:54:13+5:302018-01-11T23:54:23+5:30

शालेय शिक्षणासोबत अभ्यासपुरक उपक्रमातून मुला-मुलींना जीवनाचे खरे धडे मिळतात. स्काऊट्स आणि गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’ या प्रणालीवर आधारलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत सहजपणे समजते.

Scouts-Guides course is based on 'Learning From Game' | स्काऊट्स-गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’वर आधारीत

स्काऊट्स-गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’वर आधारीत

googlenewsNext
ठळक मुद्देजयश्री गफाट : ३४ व्या स्काऊट गाईड्स मेळाव्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : शालेय शिक्षणासोबत अभ्यासपुरक उपक्रमातून मुला-मुलींना जीवनाचे खरे धडे मिळतात. स्काऊट्स आणि गाईड्सचा अभ्यासक्रम हा ‘खेळातून शिक्षण’ या प्रणालीवर आधारलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत सहजपणे समजते. स्काऊटस कृतीशिल उपक्रमातून योग्य संस्कार, शिस्त, साहस, नवोउपक्रमशिलता व चारित्र्य घडत असते. म्हणून शिस्त, साहस व शिल संवर्धन करणारी स्काऊट चळवळीचे शिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जि.प. शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती जयश्री गफाट यांनी केले.
येथील आर.के. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्काऊटस आणि गाईडसच्या ३४ व्या जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेच्या अध्यक्ष शीतल गाते, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, सरपंच सविता गावंडे, विद्यालयाचे अध्यक्ष मोहन अग्रवाल, स्काऊट गाईडसचे जिल्हाध्यक्ष सतीश राऊत, जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे, जिल्हा आयुक्त कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, सुवर्णमाला थेरे, प्राचार्य नुरसिंग जाधव, उपमुख्याध्यापक सुधाकर गोरडे, रामभाऊ बाचले, कोषाध्यक्ष मदन मोहता, माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीनारायण सोनवणे, अंबादास वानखेडे, उमाकांत नेरकर, केशव पटेल, शैलेजा सुदामे, राज्य प्रतिनिधी शंकुतला चौधरी, जिल्हा संघटक प्रकाश डाखोळे, गाईड संघटक मंजूषा जाधव, प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, शिला पंचारिया, मुख्याध्यापक मनोहर बारस्कर, रवीकिरण भोजने, यादव, शीला कपले, रामेश्वर लांडे, निमसडकर, राठोड, रंजना दाते, विलास निळ व बोकारे उपस्थित होते.
सदर जिल्हा मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातून १२५० स्काऊटस व गाईडस सक्रीयपणे सहभागी झालेले आहे. शिबिरात साहस खेळ, बिन भाड्यांचा स्वयंपाक, पथ संचलन, प्रथमोपचार, आनंद मेळावा, तंबु सजावट व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिरीष गोडे यांनी केले. संचालन उर्मिला चौधरी व रेणुका भोयर यांनी केले तर आभार विनोद माहुरे यांनी मानले.
कार्यक्रमाला संतोष तुरक, प्रा. रविंद्र गुजरकर, पंकज घोडमारे, गजानन दत्तराज भिष्णूरकर, भरत सोनटक्के, सुनील खासरे, गणेश इंगळे, रितेश जयस्वाल यांच्यासह इतरांनी केले.

Web Title: Scouts-Guides course is based on 'Learning From Game'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.