बिबट्याचा धुमाकूळ; शेतकरी हैराण
By Admin | Published: June 25, 2017 12:38 AM2017-06-25T00:38:41+5:302017-06-25T00:38:41+5:30
जंगलव्याप्त असलेल्या या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी किसान
पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागितली परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : जंगलव्याप्त असलेल्या या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी किसान अधिकारी अभियानच्या सहकार्याने गुरुवारी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याची गंभीर दखल घेत वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकांना पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची परवागी मागितली. यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
जनावरांचा फडशा पाडणारा आक्रमक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी किसान अधिकार अभियानाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. याकडे मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले. परिणाती शेतकऱ्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन करीत मागणी रेटून धरली. यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मागण्याच्या या पत्रावर आंदोलन मागे घेतले.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. परिसरात दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले. ऐन हगामात शेती पडिक राहण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.