कोरोनाबाधित क्षेत्रातून सीमोल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 05:00 AM2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:02+5:30
तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी कोणतीही परवानगी न घेता एम.एच.३१ सी.एस. ४७०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून रात्री दोन वाजता मुलीला आपल्या गावी आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : वर्धा जिल्हा ग्रीनझोमध्ये असून या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. सर्व सीमाही बंद करण्यात आल्या असतानाही यवतमाळ या कोरोनाबाधित जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने मुलीला उबदा या गावी आणले. यामुळे प्रशासनाकडून मुलीसह तिचे वडील व इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुलीला सेवाग्राम येथील रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले तर इतरांना घरीच क्वारंटाईन केले आहे.
तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी कोणतीही परवानगी न घेता एम.एच.३१ सी.एस. ४७०० क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून रात्री दोन वाजता मुलीला आपल्या गावी आणले. यावेळी मुलीला सदी, ताप व खोकला, असे लक्षण दिसून आल्याने ग्रामपंचायत सचिवांनी याची माहिती
तालुका प्रशासन व पोलिसांना दिली. त्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार समुद्रपूर पोलिसांनी मुलीसह तिचे वडील, मामा, चुलत सासरे, वाहन चालक, मालकासह आणखी एक, अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला सेवाग्राम रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले. तिचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सहा जणांना आपापल्या घरात क्वारंटाईन करण्यात आले. कोरोनाबाधित यवतमाळ जिल्ह्यातून ही मुलगी आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दिल्लीतून दोघे आले समुद्रपुरात
सीमाबंदीनंतरही नागरिक खासगी वाहनाने किंवा रुग्णवाहिकेच्या सहाय्याने आपले गाव गाठतांना दिसून येत आहे. कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाºया या व्यक्तींमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत असून गावकऱ्यांमध्येही दहशत निर्माण होत आहे. दिल्ली येथून एका परिसरातील मुलगा व सून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने समुद्रपुरात दाखल झाले. त्यामुळे या दोघांनाही वर्ध्याला पाठवून क्वारंटाईन करण्यात आले तर त्यांच्या परिवारातील सदस्यांना घरीच क्वारंटाईन केले आहे. या सर्व परिस्थितीवर तहसीलदार राजू रणवीर, नगराध्यक्ष गजानन राऊत, मुख्याधिकारी स्वलिया मालगवे, नायब तहसीलदार के.डी.किरसान, महेंद्र सुर्यवंशी, हेमंत तायडे, ठाणेदार हेमंत चांदेवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील भगत लक्ष ठेवून आहेत.