गुगलवर नंबर शोधला अन् ४२ हजारांचा गंडा बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:26 IST2024-11-22T18:25:07+5:302024-11-22T18:26:37+5:30
Wardha : ऑनलाईन शर्ट खरेदी पडली महागात

Searched for the number on Google and scamed by 42 thousand
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ऑनलाईन शर्ट खरेदी केल्यानंतर तो परत करताना कस्टमर केअरने दिलेल्या अॅपवरुन परिचारिकेने पासवर्ड सांगितला असता तिच्या खात्यातून ४२ हजार ६१० रुपये परस्पर चोरट्याने काढून घेतल्याने फसवणूक केली. ही घटना सुदामपुरी परिसरात घडली. याप्रकरणी २० रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
वर्षा नामक परिचारिकेने ऑनलाईन साइटवरुन शर्ट खरेदी केला होता. तो शर्ट आवडला नसल्याने तिने परत पाठविला. कुरिअर घेऊन आलेल्या मुलाने तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले. परिचारिकेने गुगलवरुन कस्टमर केअरचा नंबर मिळवत त्याला फोन करुन पैसे जमा करण्यास सांगितले. अज्ञाताने एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
परिचारिकेने अॅप डाऊनलोड करत त्यातील पासवर्ड सांगितला. तरी देखील पैसे जमा झाले नाही. परिचारिकेला संशय आल्याने तिने खाते तपासले असता तिच्या खात्यातून ४२ हजार ६१० रुपयांची रक्कम चोरट्याने परस्पर काढून घेतल्याचे दिसले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.