सेबीचा आदेश सॅटकडून रद्द
By admin | Published: September 29, 2014 12:49 AM2014-09-29T00:49:28+5:302014-09-29T00:49:28+5:30
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) ने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविण्याचा आदेश दिला होता. कलेक्टीव्ह इन्व्हेस्टीव्ह स्किम अंतर्गत पॅनकार्ड क्लबचा अंतर्भाव होत असल्याची सबब देवून
सेबीच्या कारवाईचा पॅनकार्ड क्लबला फटका
वर्धा : सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) ने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविण्याचा आदेश दिला होता. कलेक्टीव्ह इन्व्हेस्टीव्ह स्किम अंतर्गत पॅनकार्ड क्लबचा अंतर्भाव होत असल्याची सबब देवून सेबीने कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार थांबविले होते. ३१ जुलै २०१४ रोजी काढण्यात आलेल्या आदेशाविरोधात पॅनकार्ड क्लब कंपनीने सॅट न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सेबीचा आदेश रद्द ठरवित पॅनकार्ड क्लबला दिलासा दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, सेबीने ३१ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार सी आयएस अंतर्गत येणाऱ्या कंपनीचे आर्थिक व्यवहार ठप्प केले होते. आदरातिथ्य, स्टार हॉटेल, क्लब, रिसोर्ट व टाईम शेअरिंग या व्यवसायात कार्यरत पॅनकार्ड क्लब लिमेटडचा यात अंतर्भाव होता. सीआय एस मध्ये समावेश असल्याचा कारणावरून आर्थिक व्यवहार बंदीचा आदेश होता. यामुळे पॅनकार्ड क्लब अंतर्गत चालणारे सर्व कामे ठप्प होती. प्रत्यक्षात पॅनकार्ड क्लबचे कार्यक्षेत्र भिन्न असताना ही बंदी योग्य नसल्याने कंपनीने सिक्युरिटी अपिलाट ट्रिक्युनल म्हणजेच सॅट न्यायाधिकरणात अपील केली. यावर न्यायाधीश जे.पी. देवधर, जोगसिंग, ए.एस.लांबा या मंडळाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून या निकालानुसार सेबीने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविल्याचा आदेश रद्द ठरविला. या निकालानंतर ४६ दिवस बंद असलेले कंपनीचे काम पूर्ववत सुरू झाले असून सर्व आर्थिक निर्बंध ठरविण्यात आले. यामुळे देशभरात ७९ शाखात कार्यरत कर्मचारी व जवळपास साडेतीन लाख गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.(स्थनिक प्रतिनिधी)