जिल्ह्यात कलम १४४ लागू

By admin | Published: November 19, 2016 01:13 AM2016-11-19T01:13:29+5:302016-11-19T01:13:29+5:30

नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत दहशतवादी कारवायांची संभावना आहे.

Section 144 applies to the district | जिल्ह्यात कलम १४४ लागू

जिल्ह्यात कलम १४४ लागू

Next

सुरक्षेच्या दृष्टीने होणार कार्यवाही
वर्धा : नगर परिषद निवडणुकीच्या कालावधीत दहशतवादी कारवायांची संभावना आहे. असे कृत्य करणारी व्यक्ती जिल्ह्यात खोट्या नावाने, भाड्याने किंवा खाजगी भाडे तत्वावर घर किंवा लॉज घेऊन राहू शकते. तसेच दहशतवादी कारवाया करून घातपात करून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता आहे. म्हणून प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९९३ चे कलम १४४ जारी केली आहे.
यात किरायाने राहणाऱ्या व्यक्तींची नोंद, त्यांचे ओळखपत्र व निवासाच्या पत्त्यासह संबंधित पोलिस स्टेशनला सादर करणे बंधनकारक आहे. दुय्यम प्रतीचे मोटर वाहन विक्री किंवा खरेदी करणारे लोकांकडून अनधिकृत व्यवहार झाल्यास अशी वाहने स्फोटात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला किरायाने किंवा भाड्याने ठेवताना घर, लॉजचालक, धर्मदाय संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक व व मालक यांनी वास्तव्यास राहणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती संबंधित पोलीस स्टेशनला लेखी कळवावी. आक्षेपार्ह सीडी, गाणे वाजविल्यामुळे जातीय, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने यावर बंदी घातली आहे. मागील तीन महिन्यात विक्री केलेल्या सीमकार्ड धारकांची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला सादर करण्याच्या सूचना आहे. सायबर कॅफे मालकांनी ओळख पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करू देऊ नये, यासाठी जिल्ह्यात ३१ डिसेंबर पर्यंत कलम १४४ लागू करण्यात आली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Section 144 applies to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.