मध्यप्रदेश सरकारच्या निषेधार्थ आत्मक्लेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 02:33 AM2017-08-09T02:33:43+5:302017-08-09T02:34:07+5:30
मध्यप्रदेशातील बडवानी येथील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची समाधी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : मध्यप्रदेशातील बडवानी येथील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची समाधी आहे. मध्यप्रदेश सरकारच्या पोलीस विभागाने समाधी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकल्याने मंगळवारी आश्रम समोर गांधीवादी तसेच गांधीप्रेमींनी आत्मक्लेष उपोषण करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.
देशालाच नव्हे तर जगाला शांती, अहिंसा व सत्याचा मंत्र व तत्त्व गांधीजींनी दिले. पण अशा महामानवाची समाधी सुद्धा हटविण्याचा, विटंबना करण्याचे कार्य मध्यप्रदेश सरकारने केले आहे. मध्यप्रदेशच्या राजघाट बडवानी येथे बापू, बा आणि महादेवभाई देसाई यांचे समाधीस्थळ आहे. २७ जुलै रोजी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने समाधीस्थळ उद्ध्वस्त करून टाकले. तसेच बडवानी परिसरातील नर्मदा धरणामुळे ४० हजार परिवारावर विस्तापित होण्याची वेळ आली आहे. त्या ठिकाणी नर्मदा बचावच्या मेधा पाटकर यांचे उपोषण व आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेऐवजी त्यांचा मंडप तोडून दंडेलशाहीचे धोरण अमलात आणून अटक केली आहे. या दोनही घटनेचा सेवाग्राम येथे निषेध नोंदविण्यात आला.
सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक तसेच वर्धेतील गांधीजींनी आत्मक्लेश उपोषण केले. यात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, किसान अधिकार अभियान, वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, ग्रामसेवा मंडळाच्या पदाधिकाºयासह जयवंत मठकर, डॉ. शिवचरण ठाकूर, अविनाश काकडे, प्रशांत गुजर, ज्ञानेश्वर ढगे, नामदेव ढोले, अनंत ठाकरे, राष्ट्रपाल गणविर प्रा. स्वप्नील देशमुख, मुन्ना शेख, सागर कोल्हे, सुधाकर ताकसांडे, सुचित्रा झाडे, प्रा. नूतन माळवी, अभिमन्यू भारती, हेमा क्रांतीकारी, शंकर बगाडे, सुनील कोल्हे, संजय काकडे, डॉ. सोहम पंड्या, प्रशांत नागोसे, भावना डगवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.