महिलांकरिता स्वयंरोजगार कार्यशाळा

By admin | Published: March 31, 2016 02:45 AM2016-03-31T02:45:23+5:302016-03-31T02:45:23+5:30

सोनेगाव (स्टेशन) येथील ग्रामपंचायत सभागृह येथे समाज प्रबोधन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, तळेगाव (टा.)

Self-employed workshops for women | महिलांकरिता स्वयंरोजगार कार्यशाळा

महिलांकरिता स्वयंरोजगार कार्यशाळा

Next

प्रशिक्षण : शासकीय योजनांची दिली माहिती
वर्धा : सोनेगाव (स्टेशन) येथील ग्रामपंचायत सभागृह येथे समाज प्रबोधन बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, तळेगाव (टा.) यांच्यावतीने युवक-युवती तसेच महिलांसाठी स्वयंरोजगारावर कार्यशाळा घेण्यात आली. यातून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रा.प. सदस्य माधुरी लोटे यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून निर्मला मगर, सीमा भस्मे, बचत गट अध्यक्ष सविता सुरवाडे होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज राऊत यांनी केले. महिलांना फिनाईल, पशु खाद्य, फळे, भाजीपाला, प्रक्रीया, ब्युटीपार्लर, दाल मिल, धान्य उद्योग, हातकागज, मेणबत्ती, अगरबत्ती, लाख तयार करणे याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी बोलताना सीमा भस्मे म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग करण्यासाठी कटीबध्द असावे. मनाची तयारी करुन कौशल्य हस्तगत करावे. बाजारपेठेची माहिती, उत्पादनास असणारा वाव याची माहिती घ्यावी. गावातच स्वयंरोजगार निर्माण झाल्यास खेडे समृद्ध होईल. तर भारत देश समृध्द होईल, असे मत व्यक्त केले. युवक-युवतींनी स्वयंरोजगार निर्माण करण्यावर भर द्यावा. स्वयंरोजगार ही काळाची गरज आहे. शासनाची अंगीकृत महामंडळ आहेत. शैक्षणिक संस्था, बॅँका, उद्योग समुह, व्यापार समुह, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था, औद्योगिक संघटना येथून मार्गदर्शन व मदत केली जाते. याकरिता ग्रामीण स्तवारवर उद्योग मंचाची स्थापना करणे गरजेचे आहे.
यानंतर बोलताना माधुरी लोटे म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यास वाव आहे. शासन स्वयंरोजगार निर्मीतीसाठी मदत करीत असून महिलांनी व युवक-युवतीने शेतीवर आधारीत फळबाग लागवड करून आंबा, चिकु, फणस, आवळा, पेरू इत्यादीवर प्रक्रिया करून त्याची विक्री करावी. यातून रोजगार निर्मीती होईल.महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार छाया कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला अर्चना तामगाडगे, प्रेमिला सातघरे, कल्पना पाटील, चंद्रकला लोटे, बेबी खटारे आदींनी सहकार्य केले. शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Self-employed workshops for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.