वर्धिनीमुळे उभारली स्वयंसहाय्यता गटाची चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:30 PM2018-04-07T23:30:14+5:302018-04-07T23:30:14+5:30

दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे.

The self-help group movement created by the uplift | वर्धिनीमुळे उभारली स्वयंसहाय्यता गटाची चळवळ

वर्धिनीमुळे उभारली स्वयंसहाय्यता गटाची चळवळ

Next
ठळक मुद्देनितीन मडावी : उमेद अंतर्गत वर्धिनीचे स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटाच्या उत्पादनाची विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यामध्ये समूदाय संसाधन व्यक्तीची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. वर्धा येथील उमेद अंतर्गत वर्धिनी या सामाजिक समावेशन संस्थात्मक बांधणीमध्ये महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी या १५ दिवस ते ४५ दिवस घराबाहेर राहून कामकरीत असून काम करण्यात अग्रेसर आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचे नाव होत आहे. जिल्ह्यात स्वयंसहायता गटाची चळवळ निर्माण झाली. यामुळे प्रत्येक महिलेने उद्योगशील व्हावे, असे प्रतिपादन, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत वर्धिनी स्रेहसंमेलन व स्वयंसहाय्यता गटातील तयार करण्यात येणारे प्रोडक्ट व खाद्य पदार्थ विक्रीच्या तीन दिवसीय प्रदर्शनीचे नियोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धाद्वारे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला मान्यवर म्हणून जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, शिक्षण सभापती जयश्री गफाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, समाजकल्याण सभापती निता गजाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प अधिकारी संचालक डॉ. करूणा जुईकर, राज्य अभियान व्यवस्थापक सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी वैशाली ठाकूर, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, वर्धिनी कक्ष प्रमुख अमोलसिंग रोटेले उपस्थित होते.
राज्यातील सामाजिक समावेशनाचे कार्य १३ जिल्ह्यातील वर्धिनी म्हणून वर्धेमार्फत यवतमाळ, गोंदीया, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, जालना, अमरावती येथे करण्यात आले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये ४,९६८ तर वर्ष २०१६-१७ मध्ये ४,६३५ असे एकूण स्वयंसहाय्यता गट ९,६०३ बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली. गरीबातील गरीब घटकांना त्यांची जागा मिळून देण्यासाठी कार्य करताना वर्धिनीच्या माध्यमातून गरीबीच्या दुचक्रातून बाहेर निघण्याचे मार्ग त्यांचे अधिकार या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना फक्त स्वयंसहाय्यता समूहामध्ये सहभागी होणे असून हे त्यांच्या स्वत:चा विकास व कुटुंबाचा विकास योग्य पद्धतीने करीत आहे. या कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वर्धिनींना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. वर्धिनीद्वारे २०१६-१७ मध्ये केलेल्या कामाचे पुस्तक तयार करण्यात आले असून याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: The self-help group movement created by the uplift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.